पिंपरी : ज्ञानोबा-तुकारामाच्या अखंड जयघोषात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा निगडीतील भक्ती-शक्ती चौकात दाखल होतच वातावरण भक्तीमय झाले. विठुरायाच्या भक्तीत तल्लीन होऊन नाचणाऱ्या भाविकांसोबत पिंपरी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, प्रदीप जांभळे, उल्हास जगताप ‘ज्ञानोबा-माऊली-तुकाराम’ च्या जयघोषात दंग झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत सायंकाळी साडे पाच वाजता तुकोबांची पालखी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाली. पालखी सोहळ्यामुळे सर्व परिसर भक्तिमय झाला. विठुरायाच्या भक्तीत तल्लीन होऊन नाचणाऱ्या भाविकांना पाहून महापालिकेचे आयुक्त, अधिकारीही त्यात उत्साहाने सहभागी झाले. आयुक्त शेखर सिंह यांच्यासह अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, प्रदीप जांभळे, उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनीही या सोहळ्यात सहभागी होत ‘ज्ञानोबा-माऊली-तुकाराम’ च्या जयघोषावर ठेका धरला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri municipal commissioner additional commissioner present in the palanquin of dyanoba mauli tukaram pune print news ggy 03 amy