पिंपरी शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी, मुळा नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर निळ्या पूररेषेतील बांधकामांचे महापालिकेने सर्वेक्षण हाती घेतले आहे. आठ दिवसांत सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर नद्यांलगत असलेली बांधकामे पोलीस बंदोबस्तात पाडली जाणार आहेत.

पूररेषेतील बांधकामांवरील कारवाईच्या नियोजनाबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची बैठक झाली. सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम, उपआयुक्त मनोज लोणकर, पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे यावेळी उपस्थित होते.

Pimpri Chinchwad, teacher, sexual abuse, minor girl, Badlapur incident, child sexual abuse, principal, trustee, arrest
पिंपरी चिंचवड: तीन वर्षे शिक्षक बारा वर्षीय मुलीचे करत होता लैंगिक शोषण; बदलापूरच्या घटनेमुळे फुटली वाचा!
12th september rashi bhavishya राशी, राशिभविष्य, आजचे राशिभविष्य, राशीवृत्त देणार
१२ सप्टेंबर पंचांग: ‘आयुष्मान योग’ सिंह, कर्कसह ‘या’ राशींचे नशीब पालटणार? बक्कळ धनलाभ तर रखडलेली कामे पूर्ण होणार; वाचा तुमचे भविष्य
Pimpri Municipal Corporation notice to banks regarding closed accounts of beneficiary women pune news
पिंपरी: लाभार्थी महिलांची बंद खाती सुरू करा; महापालिकेच्या बँकांना सूचना
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
Former BJP corporator Ravi Landge will go to Matoshree and tie Shivbandhan
पिंपरी- चिंचवडमध्ये भाजपला धक्का! भाजपचा नेता बांधणार ठाकरे गटाचे शिवबंधन
sunil tingre connection with Porsche car accident
कल्याणीनगर अपघात प्रकरणात आमदार टिंगरेंची चौकशी केल्याला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दुजोरा
pune police inspector koyta attack marathi news
भांडणात मध्यस्थी करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकावर सराइतांकडून कोयत्याने वार, हडपसर भागातील घटना
passengers had to be pulled out of water along with their bags and belongings at pune railway station
पुणे रेल्वे स्थानक ‘पाण्यात’! बॅग, सामानासह पाण्यातून वाट काढण्याची प्रवाशांवर वेळ

हेही वाचा >>>पुणे : सायबर चोरट्यांकडून एक कोटी २२ लाखांची फसवणूक, फसवणुकीचे सत्र कायम

पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. पवना नदीची महापालिका हद्दीतील लांबी २४.३४ किलोमीटर, इंद्रायणी नदीची लांबी २०.८५ किलोमीटर आहे. तर, मुळा नदी शहराच्या सीमेवरून दहा किलोमीटर अंतर वाहते. या नद्यांच्या पुराची सरासरी निश्चित करून निळी पूररेषा आखली आहे. या पूररेषेत कोणतेही बांधकाम करता येत नाही. परंतु, तिन्ही नद्यांकाठी अनेक ठिकाणी पूररेषेमध्ये अनधिकृत बांधकामे झाल्याचे दिसून येते. शहरी भागात होणारा पाऊस तसेच धरणांमधून होणाऱ्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होते. पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर नदीकाठातील भागात पाणी शिरते. यंदा घरांमध्ये पाणी शिरल्याने पाच हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करावे लागले होते. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेने निळ्या पूररेषेतील बांधकामांचे सर्वेक्षण हाती घेतले. आठ दिवसांत सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे.

निळ्या पूररेषेतील बांधकामाचे सर्वेक्षण आठ दिवसांत पूर्ण केले जाईल. त्यानंतर बांधकामांवर पोलीस बंदोबस्तात कारवाई केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.