लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत महापालिकेशी संबंधित अभिलेखांमधील कुणबी जातीच्या नोंदी शोधल्या जाणार आहेत. या नोंदीची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा
Delhi High Court
Delhi High Court : वकिलाकडून न्यायमूर्तीवर अपमानास्पद टिप्पणी; दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावली चार महिन्यांची शिक्षा
Dawood t-shirt, Lawrence Bishnoi t-shirt,
दाऊद, लॉरेन्स बिष्णोईचे टीशर्ट विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल; महाराष्ट्र सायबर पोलिसांची कारवाई
A hoax bomb threat, Bharati Vidyapeeth medical college
भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाला बाॅम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल
drug cartel kingpin lalit patil
चाकणमधील मेफेड्रोन प्रकरण;  खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ; अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मुख्य आरोपी

राज्य शासनाच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने १९४८ ते १९६७ या कालावधीतील जन्म-मृत्यू नोंदी, शैक्षणिक अभिलेख, भूमी अभिलेख, सेवानोंद पुस्तके, तसेच महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या करआकारणी नोंदवहीमध्ये कुणबी जातीच्या पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी केली जाणार आहे. त्याबाबतचा अहवाल शासनाच्या मार्गदर्शक निर्देशांनुसार सादर केला जाणार आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभाग, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, भूमि व जिंदगी, लेखा विभाग तसेच करआकारणी व करसंकलन विभागाच्या प्रमुखांनी सन १९४८ ते १९६७ या कालावधीमध्ये महापालिकेच्या उपलब्ध अभिलेखांची छाननी करावी.

आणखी वाचा-पुणे: विद्यापीठाच्या परिसरात जमावबंदी; हाणामारी, मोर्चांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा आदेश

अभिलेखांमध्ये कुणबी जातीच्या नोंदी असल्याचे आढळून आल्यास अशा पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी केली जाणार आहे. या कामकाजासाठी संबंधित विभागाचे प्रमुख जबाबदार असणार आहेत. या विभागप्रमुखांनी नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कामकाज पूर्ण करावे. या कामकाजासाठी संबंधित विभागाच्या कर्मचारी वर्गाची नियुक्ती करावी, पुराव्याच्या तपासणीअंती विभागस्तरावर स्वतंत्र नोंदवही तयार करण्यात यावी. विवरण पत्रामध्ये माहितीच्या नोंदी आणि संकलन करून ते नोडल अधिकाऱ्यांकडे सादर करावे. हे काम कालमर्यादित असून, वेळेत कामकाज पूर्ण करावे, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.