पिंपरीः पिंपरी पालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ‘राष्ट्रीय एकता दौड’चे आयोजन करण्यात आले होते. शहरवासीयांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. देशाची एकता, अखंडता तसेच सुरक्षितता जपण्यासाठी या वेळी शपथ देण्यात आली. पालिकेकडून आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्रपणे राष्ट्रीय एकता फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये माजी नगरसेवक, विविध संस्था, संघटना, क्रीडा संस्थांचे सदस्य, खेळाडू, ज्येष्ठ नागरिक आदी या फेरीत सहभागी झाले होते. राष्ट्रीय एकता दिवसानिमित्ताने उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घतेली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri municipality regional offices organizing rashtriya ekta daud pune print news ysh