कामगारांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच त्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी, शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी पिंपरी पालिका आणि शहरातील उद्योजकांनी एकत्रितपणे काम केल्यास सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केला.पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगीण विकासासाठी उद्योगांना सहभागी करून घेण्यासाठी पालिकेने शहरातील उद्योजकांसमवेत समन्वय बैठक घेतली. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम यांच्यासह प्रदीप भार्गव, मेहेर पुदुमजी, सोनवी खन्ना, प्रिती किबे आदी उद्योगांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते. शहरातील कामगारांची सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा तसेच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
हेही वाचा >>>पुणे: प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की; पसार झालेला आरोपी दोन महिन्यांनी अटकेत
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, शहराला देशातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहर बनवत असताना उद्योग आणि कामगारांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. शहरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचे प्रश्न सोडवून त्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी, शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी महापालिका आणि उद्योजकांनी योग्य समन्वय साधून कामगारांच्या हितासाठी काम केल्यास शहरात सकारात्मक बदल घडेल.