थेरगाव क्वीनसोबत अश्लील भाषा आणि धमकीचे रील बनवणारा तिचा मित्र कुणाल राजू कांबळेला पिंपरी सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. कुणाल हा साक्षीसह इंस्टाग्रामवरील रील बनवायचा. याअगोदर साक्षी हेमंत श्रीश्रीमल (१८) आणि साक्षी राकेश कश्यप (१८) यांना अटक करण्यात आली होती. तिघांवर कलम २९२, २९४, ५०६, ३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही दिवसांपासून अश्लील भाषा वापरून आणि इंस्टाग्रामवर धमकीचे रील बनवणाऱ्या थेरगाव क्वीनला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. मात्र, त्यांचा साथीदार मित्र कुणाल हा फरार होता. त्याला पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरून ताब्यात घेण्यात आलं अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिली आहे.

‘इन्स्टा’वर अश्लील आणि धमकीचे व्हिडीओ पोस्ट करणे पडले महागात ; दोन तरूणींना अटक

थेरगाव क्वीनचे ४१ हजार फॉलोअर्स असून ते अधिक वाढवण्याच्या प्रयत्नात अश्लील भाषा, धमकीचे रील बनवत होती. परंतु, हीच अश्लील भाषा, धमकीचे रील यांनी त्यांना गजाआड केलं आहे. दरम्यान, कुणालला बेड्या ठोकून पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सर्वांची हात जोडून माफी मागितली आहे. “माझ्याकडून व्हिडीओ करताना चूक झाली. खूप मुलींचं मन दुखावलं गेलं. मी सर्वांची माफी मागतो. पुन्हा असे व्हिडीओ करणार नाही. सॉरी,” असा हात जोडून माफी मागत असल्याचा त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri police arrested friend of instagram thergaon queen kjp 91 sgy