पिंपरी : पोलीस ठाण्यासमोर वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍या ज्युसच्या तीन गाड्या, टेम्पो व दुचाकीवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात असताना कारवाईला विरोध करीत कुटंबातील तिघांनी अतिक्रमण विभागातील अधिकार्‍यांना शिवीगाळ केली. पोलिसांनाही मारहाण केली. हा प्रकार दिघी पोलीस ठाण्यासमोर घडला.

पोलिस अंमलदार सुधीर डोळस यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कंठाराम दामोदर (वय ५२), आशिष कंठाराम दामोदर (वय २०) व नलुबाई कंठाराम दामोदर या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी यांनी त्यांच्या ज्युसच्या तीन गाड्या, टेम्पो व दुचाकी आडवी लावून पोलीस ठाण्यामध्ये येणार्‍या – जाणार्‍या नागरिकांचा व पोलिसांचा वाहतुकीचा रस्ता अडविला.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
constable commits suicide marathi news
पुणे: महिला पोलीस शिपायाची इंद्रायणी नदीत उडी; तरुणाने वाचवण्याचा प्रयत्न केला पण…
sunil tingre connection with Porsche car accident
कल्याणीनगर अपघात प्रकरणात आमदार टिंगरेंची चौकशी केल्याला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दुजोरा
Indapur Truck Drunk and Drive
Pune Indapur Truck : पुण्यात मद्यधुंद ट्रक चालकाचा थरार! हॉटेल मालकाने जेवण नाकारल्याने हॉटेलमध्ये घातला ट्रक, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Puneri pati viral for parking in his spot funny puneri pati goes viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे; शेवटचं बक्षिस वाचून पोट धरुन हसाल
Mahesh landge death threat marathi news
आमदार महेश लांडगेंना जीवे मारण्याची धमकी; धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

हेही वाचा – देव झालो, असे स्वत: म्हणू नये; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

वाहने काढण्यासाठी अतिक्रमण विभगाचे अधिकारी आले असता त्यांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांना मारहाण केली. तसेच, त्यांच्याकडील पेट्रोल स्वत:च्या व पोलिसांच्या अंगावर टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक अंभोरे तपास करीत आहेत.

हेही वाचा – देव झालो, असे स्वत: म्हणू नये; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. क्षुल्लक कारणावरून कोयत्याने मारहाण, लोखंडी गजाने मारहाण केल्याचा घटना घडत आहेत. आता पोलिसांनाच मारण्यापर्यंत आरोपींची मजल गेली आहे. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.