पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याने चक्क मयत व्यक्तीवरच गुन्हा दाखल केला आहे. रमेश वाघमारे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका महिलेने वाकड पोलिसात मयत सासरे, पती आणि सासुविरोधात तक्रार दिली आहे. परंतु सासरे रमेश वाघमारे यांचा २७ जून २०१८ रोजी मृत्यू झाला आहे. मात्र, तक्रारीत उल्लेख असल्याने पोलिसांनी मयत रमेश वाघमारे यांच्यावरही गुन्हा दाखल केला. तक्रारदार महिलेचा मे २०१५ मध्ये मयत रमेश वाघमारे यांच्या मुलाशी विवाह झाला होता. मात्र, व्यवसायासाठी माहेरुन ५ लाख रुपये घेऊन ये, असा तगादा सासरच्यांनी लावल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले होते. चारित्र्यावर संशय घेऊन मला मारहाण केल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी पाच महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी प्रतिक्रिया दिली. फिर्यादीतील प्रिंटिंग चूक असल्याचे म्हणत त्यांनी मयतावर गुन्हा दाखल करता येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri police booked died person in dowry case
Show comments