पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून रविवारी रात्रीपासून विशेष मोहीम (ऑल आऊट ऑपरेशन) राबविण्यात आली. सराईत ६०५ गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली असून ५७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार पोलीस आयुक्तालय हद्दीत रविवारी रात्री साडेदहा वाजल्यापासून कारवाईला सुरुवात केली. सोमवारी पहाटे चार वाजेपर्यंत ही मोहीम सुरू होती. नाकाबंदीत एक हजार ८७८ संशियत वाहनांची तपासणी केली. सराईत ६०५ आरोपींची झडती घेतली. १८३ वाहनांवर मोटार व्हेईकल ॲक्टनुसार कारवाई करून तीन लाख २६ हजार ८०० रुपये दंड वसूल केला आहे.
हेही वाचा >>> छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी; काेल्हापूरमधील तरुण ताब्यात
याशिवाय १०३ उपाहारगृहे-लॉज, ७० संशयित व्यक्तींची तपासणी केली. विविध गुन्ह्यांत फरार असलेल्या ५७ आरोपींना अटक केली. १५ संशयित वाहने ताब्यात घेतली. ११ जणांना अटक वॉरंट बजाविले. शस्त्र बाळगणाऱ्या दोन तर महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत तीन कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवाईत ७९ पोलीस अधिकारी, ४२२ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.