पिंपरी : पिंपरी पोलिसांनी पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना अटक केली आहे. यात तडीपार गुंडाचा देखील समावेश आहे. जुनेद जमील शेख याच्याकडून दोन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तर दुसऱ्या कारवाईत तडीपार गुंड गणेश उर्फ मॅड कांबळे कडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे पिंपरी पोलिसांनी जप्त केली आहेत. दोघांकडून एकूण तीन पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे मिळाली आहेत.

पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑटोक्लस्टरकडे जाणाऱ्या रस्त्यावर जुनेद जमील शेख हा त्याच्या मित्राला भेटण्यासाठी येणार असून त्याच्याकडे पिस्तूल आहे. अशी खबऱ्याने पिंपरी पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर सापळा रचून जुनेदला पिंपरी पोलिसांनी अटक केली. जुनेदकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केले आहेत.

government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
pune four pistols and two bikes seized
कोंढव्यात तिघांकडून चार पिस्तुले, दोन दुचाकी जप्त
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
Baba Siddique murder case, Five people in police custody, Baba Siddique news, Baba Siddique latest news,
पाच जणांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण
terrorist 44 killed during the year in jammu region
जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत

आणखी वाचा-मोठ्या गृहप्रकल्पांना पाणीपुरवठ्याची जबाबदारी महापालिकांची?

दुसऱ्या कारवाईत तडीपार गुंड गणेश उर्फ मॅड कांबळे हा हवेत पिस्तूल मिरवत परिसरात दहशत माजवत होता. याबाबतची पिंपरी पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. परंतु, तडीपार गुंड हे पोलिसांच्या हद्दीत येऊनही याबाबत पोलिसांना माहिती का मिळत नाही? असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. अनेकदा मोक्का आणि तडीपार असलेले गुंड पिंपरी- चिंचवडमध्ये आढळून आलेले आहेत. याकडे पोलिसांनी गांभीर्याने बघणे गरजेचे आहे.