पिंपरी : देशात आणि राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या सुरू असलेला गोंधळ जनता उघड्या डोळ्याने पाहते आहे. नेता जसे वागतो, त्याचे अनुकरण कार्यकर्तेही करतात. वास्तविक, कामाशी बांधिलकी असलेले कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत व त्यांनी जबाबदारी ओळखून वागले पाहिजे, असे मत पिंपरी-चिंचवडचे पहिले महापौर तसेच पहिले आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांनी रविवारी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : कवितालेखन हा परकाया प्रवेशच गुरु ठाकूर यांचे मत

हेही वाचा >>> पिंपरी : घाणेरड्या पद्धतीने सादर होणाऱ्या लावण्यांवर बंदी घाला; लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर – काळे यांची मागणी

कलारंजन प्रतिष्ठानच्या वतीने  चिंचवड येथे पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘पैस रंगमंच’ येथे लांडगे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले यांनी लांडगे यांच्याशी संवाद साधला. माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेवक मधु जोशी, पंडित गवळी, नितीन लांडगे, जयनाथ काटे, शरद काळभोर आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>> पुणे : लोणी काळभोरमध्ये पेट्रोल चोरट्यांच्या अड्ड्यावर छापा; ८० लाखांच्या मुद्देमालासह सात जणांना अटक

या मुलाखतीत बालपणापासून ते आतापर्यंतचा जीवनपट लांडगे यांनी उलगडून सांगितला. पारंपरिक शेती, कुस्तीचे आखाडे, पुणे विद्यापीठाकडून कुस्तीचे कर्णधार म्हणून मिळालेली संधी, १९६७ साली भूषवलेले भोसरीचे सरपंचपद, १९८६ साली नगरसेवक झाल्यानंतर शहराचे पहिले महापौर होण्याचा बहुमान, १९९० साली ‘हवेली’तून आमदार म्हणून विजयी, १९९५ ची बहुचर्चित बंडखोरी, पवना बँक आणि पिंपरी-चिंचवड तंत्रनिकेतन शिक्षण संस्थेच्या उभारणीत दिलेले भरीव योगदान आदींचा त्यात समावेश होता. या निमित्ताने लांडगे यांनी विविध आठवणींना उजाळा दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri prepare workers who are committed work opinion former mla dnyaneshwar landge pune print news ysh