पिंपरीत चार वर्षांच्या मुलीला भूताची भीती दाखवत निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी उच्चाप्पा लिंगप्पा मंगळूर (वय २३) याला अटक केली असून तो तडीपार गुंड आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरीतील नागसेन झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या चार वर्षांच्या मुलीला मंगळवारी संध्याकाळी एका नराधमाने भूताची भीती दाखवत निर्जनस्थळी नेले. संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास त्याने मुलीला निर्जनस्थळी नेले. यानंतर नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. जवळपास अडीच तासानंतर पीडित मुलगी घरी परतली. घरी परतल्यावर तिने वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या वडिलांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पीडित मुलीवर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पिंपरी पोलिसांनी या प्रकरणी उच्चाप्पा लिंगप्पा मंगळूर (वय २३) याला अटक केली असून तो तडीपार गुंड आहे. डिसेंबर २०१७ ते डिसेंबर २०१९ या कालावधीसाठी त्याला तडीपार करण्यात आले होते. मात्र, यानंतरही तो चार वेळा परिसरात सापडला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri rape on 4 year old girl in nagsen slum area
Show comments