पिंपरी : आळंदी येथील अनाथ मुलांच्या निवासी संस्थेत देखरेख ठेवणार्‍या कर्मचार्‍याने एका १२ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. ही घटना १७ ऑगस्ट रोजी पहाटे घडली. पोलिसांनी आरोपी कर्मचार्‍याला अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – तळजाई टेकडी परिसरात लूटमार करणारे गजाआड

हेही वाचा – धक्कादायक : पुण्यात अल्पवयीन मुलीवर शाळेत अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीला पोलिसांनी केली अटक

व्यंकटेश काशिनाथ माडनूर (रा. आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित १२ वर्षीय मुलाने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आळंदीमध्ये अनाथ मुलांच्या निवासाची व्यवस्था राखणारी संस्था आहे. त्या संस्थेत आरोपी व्यंकटेश हा देखरेख ठेवण्याचे काम करतो. तर, पीडित मुलगा अनाथ असून तो त्या संस्थेत निवास करत असून बाहेर एका शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहे. १७ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता आरोपी हा पीडित मुलाच्या खोलीत आला. त्याने मुलाला उठवले. दूरचित्रवाहिनी रूममध्ये नेले. तिथे मुलाला मोबाइल पाहायला देऊन त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक साळी तपास करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri sexual abuse of an orphan minor boy by an employee of a residential institution incident in alandi pune print news ggy 03 ssb