गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, स्मार्ट सिटीज कौन्सिल इंडियाच्या वतीने आयोजित ‘स्मार्ट शहरीकरण २०२२’ प्रदर्शनात पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीला तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. स्मार्ट एनर्जी, नागरी सहभाग आणि नेतृत्व या श्रेणीत हे पुरस्कार देण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> पुणे : सत्ताधाऱ्यांना पवारांची संगत नकोशी?; मेळाव्याकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांनी फिरवली पाठ

मुंबईत स्मार्ट सिटी कौन्सिल इंडियाचे संस्थापक प्रताप पडोडे, महाराष्ट्र शासनाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, एलव्हीएक्स ग्लोबलचे संस्थापक अध्यक्ष कोरी ग्रे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पुरस्कारांचा स्वीकार केला. ‘लीडरशिप अवॉर्ड’ श्रेणीत माजी आयुक्त राजेश पाटील यांना पुरस्कार मिळाला. नागरिकांच्या सहभागाच्या क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पासाठी पिंपरी ‘स्मार्ट सारथी सिटीझन इंगेजमेंट’ या प्रकल्पाला पुरस्कार प्राप्त झाला. तसेच ‘स्मार्ट सोलर एनर्जी’ या प्रकल्पाला शाश्वत स्मार्ट एनर्जी सोल्यूशन्स डिझाइन आणि अमलात आणण्याच्या प्रभावी पद्धतीला प्रोत्साहन दिल्याबद्दल पुरस्कार मिळाला आहे.

Story img Loader