पिंपरी : भोसरी, इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलात चार कोटी रुपये खर्च करून नव्याने तयार केलेला कृत्रिम धावमार्ग (सिंथेटिक ट्रॅक) पुन्हा उखडला आहे. पोलीस भरती प्रक्रियेसाठीची शारीरिक चाचणी झाल्यानंतर धावमार्गाची दुरवस्था झाली आहे. वारंवार नादुरुस्त होणाऱ्या धावमार्गामुळे खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरावाअभावी खेळाडूंच्या कामागिरीवरही परिणाम झाला आहे. धावमार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाला असून चार कोटींचा खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील ॲथलेटिक्सचा सराव करणाऱ्या खेळाडूंना सरावासाठी इंद्रायणीनगरमधील एकमेव मैदान आहे. या ठिकाणी चारशे मीटरचा आठ लेनचा कृत्रिम धावमार्ग आहे. अनेक वर्षांपासून धावमार्गावर खेळाडूंचा नियमित सराव आणि विविध स्पर्धांमुळे, तसेच बाहेरील वातावरणामुळे जुना धावमार्ग खराब झाला होता. वर्षभरापूर्वी जुना धावमार्ग बदलण्याचे काम हाती घेण्यात आले होते. महापालिकेने चार कोटी रुपये खर्च करून हा नवीन धावमार्ग उभारला. १५ मार्च २०२४ रोजी एक वर्षानंतर खेळांडूंसाठी हा धावमार्ग खुला करण्यात आला. धावमार्गावर ॲथलेटिक्स खेळाडू सराव करत असताना अवघ्या पाचच दिवसांत हा मार्ग उखडला होता. त्यामुळे दुरुस्तीसाठी हा धावमार्ग बंद करण्याची नामुष्की महापालिकेवर आली होती. जून महिन्यात या मैदानावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या शिपाई पदाच्या पोलीस भरतीसाठी उमेदवारांची निवड क्षमता चाचणी घेण्यात आली. त्यानंतर हा धावमार्ग पूर्णपणे उखडला असून जागोजोगी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या धावमार्गावर सराव करताना ॲथलेटिक्स खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Water connections of 245 houses disconnected due to water theft
पाणी चोरी भोवली, २४५ घरांची नळ जोडणी तोडली
Versova-Bhyander Coastal Road Project, contracts ,
वर्सोवा-भाईंदर किनारपट्टी मार्ग प्रकल्पाचे गौडबंगाल, महापालिका अधिकाऱ्यांकडून २२ हजार कोटींची खैरात
Paver blocks in Matheran make it difficult for horses to walk
माथेरानमधील पेव्हर ब्लॉक अश्वांच्या जीवावर
Badlapur, chemical sewage channel, underground sewerage scheme, old channel, sewage Badlapur, l
बदलापूर : रासायनिक सांडपाणी वाहिनीचा प्रश्न सुटणार! १२८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला सुरुवात, जुनी वाहिनी बदलणार
Why is the surrender of Naxalite godmother Tarakka important
३४ वर्षांपासून चळवळीत… १७० हून अधिक गुन्हे, चार राज्यांत १ कोटींचे बक्षीस… नक्षलींची ‘गॉडमदर’ तारक्काचे आत्मसमर्पण का महत्त्वाचे?
Wardha River , Chandrapur , Maurya,
वर्धा नदीच्या काठावर मौर्यकालीन अवशेष…

हेही वाचा – मराठवाडा वगळता राज्यातील धरणे काठोकाठ, सविस्तर वाचा राज्यातील विभागनिहाय पाणीसाठा

धावमार्ग पुन्हा बंद?

बालेवाडी मैदानात २१ आणि २२ सप्टेंबरला राज्यस्तरीय ॲथलेटिक्स खेळाडू निवड स्पर्धा होणार आहे. आता दुरुस्तीच्या नावावर पुन्हा धावमार्ग बंद केल्यास सरावाअभावी राज्यस्तरीय निवड चाचणीत मागे पडण्याची भीती काही खेळाडू आणि ॲथलेटिक्स प्रशिक्षकांनी बोलून दाखविली. त्यामुळे हा धावमार्ग सरावासाठी खुलाच ठेवण्याची मागणी खेळाडूंमधून होत आहे.

ॲथलेटिक्स खेळाची माहिती नसलेले लोक धावमार्गाबाबत निर्णय घेत आहेत. दोन वर्षांपासून सरावात सातत्याने अडथळे येत आहेत. त्यामुळे खेळाडूंचे नुकसान झाले आहे. सराव पूर्ण न झाल्याने काही खेळाडूंचे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. खेळाडूंच्या भवितव्यासाठी धावमार्ग तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी ॲथलेटिक्स क्रीडा प्रशिक्षक दिनेश देवकाते यांनी केली.

हेही वाचा – देशातून ऑस्ट्रेलियाला प्रथमच डाळिंब निर्यात; जाणून घ्या, नेमकं काय घडलं, संधी काय?

पोलीस भरतीसाठी मोठ्या संख्येने परीक्षार्थी मैदानावर आले होते. शहरासाठी भरतीही आवश्यक होती. धावमार्गावर विशिष्ट बूट घालून गेले पाहिजे. ठेकेदाराला पाठिशी घातले जाणार नाही. त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी केली जाईल. तपासणीत त्रुटी, कामाचा निकृष्ट दर्जा आढळल्यास ठेकेदाराकडून पैसे वसूल केले जातील. ठेकेदाराची अनामत रक्कम महापालिकेकडे असल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

Story img Loader