पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये चिखली-कुदळवाडी भागातील बेकायदेशीर भंगार दुकानचालक आणि बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनासह अन्य सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाने एकत्रितपणे ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करावा आणि कारवाई सुरू करावी, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, अशी माहिती भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी दिली.

चिखली-कुदळवाडी येथे सोमवारी पहाटे भंगार दुकांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या दुर्घटनेमध्ये ५० दुकाने खाक झाली आहेत. मुंबईमध्ये राज्य सरकारचे विशेष अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार महेश लांडगे यांनी या मुद्याकडे लक्ष वेधले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्र दिले आहे. याची तातडीने दखल घेत मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे निर्देश दिले आहेत.

mumbai scrap shops loksatta news
मुंबई : कुर्ला येथे भीषण आगीत भंगार दुकाने जळून खाक
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
commercial building, Ghatkopar , fire,
मुंबई : घाटकोपरमधील व्यावसायिक इमारतीला भीषण आग
Democracy Day held monthly on first Monday to address citizen issues and improve communication
पिंपरी : महापालिकेत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन; तक्रार महिन्याभरात निकाली…
upper tehsil office at ashvi in sangamner taluka
संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय
Commissioner orders surgical strike on encroachments to break traffic jam
कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
Building catches fire in Thane residents escape safely
ठाण्यात इमारतीला आग, रहिवाशांची सुखरूप सुटका
Fire breaks out at Goregaon furniture market
गोरेगावमध्ये फर्निचर मार्केटमध्ये आग; आगीची तीव्रता आणखी वाढली

हेही वाचा – ‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम

आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे की, औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील चिखली-कुदळवाडी या भागात मोठ्या प्रमाणात भंगार व्यावसायिकांची दुकाने आहेत. अनेकदा तक्रार आणि कारवाई करुनही पुन्हा या ठिकाणी भंगारचा धंदा केला जातो. या ठिकाणी अनधिकृतपणे कचरा जाळला जातो. त्यामुळे अनेकदा आगीच्या घटना घडल्या आहेत. परिणामी, परिसरातील नागरिक, सोसायटीधारकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

सोमवारी पहाटे पुन्हा एकदा चिखलीमध्ये गोडाऊनला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी महानगरपालिकेची नऊ अग्निशमन दलाची वाहनांच्या माध्यमातून घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत ५० भंगार दुकाने खाक झाली आहे. काही किलोमीटर अंतरावरून धुरांचे लोट दिसत असल्याने ही आग किती भीषण होती, याचा अंदाज येतो. पर्यावरण आणि नागरी आरोग्याची हानी मोठ्याप्रमाणात होते आहे.

गंभीर बाब म्हणजे, पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या वर्षभरामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे शहरात वास्तव्य करणाऱ्या ७० हून अधिक बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली. बहुतांशी बांगलादेशी घुसखोर अशा भंगार दुकानांवर काम करतात. पिंपरी-चिंचवड पोलिस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांनी सातत्त्याने कारवाई सुरू ठेवली आहे. असे असले तरी, पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक आहे, अशी भूमिका आमदार लांडगे मांडली. त्यावर तातडीने कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा – साधकाच्या वेशात चोरी करणारा चोरटा गजाआड; पुणे, पिंपरीसह मुंबईत वाईत चोरीचे गुन्हे

चिखली-कुदळवाडीमध्ये भंगार दुकानाला आगीच्या घटना वारंवार होत आहे. सदर दुकाने बेकायदेशीर आहेत. स्थानिक प्रशासनाकडून कारवाई केली जाते. मात्र, पुन्हा ही दुकाने थाटली जातात. या दुकानांमध्ये बांगलादेशी घुसखोर काम करीत असल्याचा संशय आहेत. काही घटनांमध्ये ही बाब समोर आली आहे. त्यामुळे शहराच्या सुरक्षेबाबत या घटनांचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासन, गुप्तचर यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने चिखली-कुदळवाडीसह पिंपरी-चिंचवडमधील बांगलादेशी घुसखोरांचा कठोर बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. त्या अनुशंगाने राज्याच्या गृहविभागाने धोरणात्मक निर्णय घेवून तातडीने कारवाई करण्यात येणार आहे. तसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत, असे आमदार लांडगे यांनी सांगितले.

Story img Loader