पर्यावरण जागृती तसेच व्यायामाचे महत्त्व पटवून देण्याच्या हेतूने पीएमपीच्या सहा कर्मचाऱ्यांनी पिंपरी ते बालाजी दरम्यान सायकलवरून प्रवास केला. तेथून परतल्यानंतर महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते त्यांचा पालिका मुख्यालयात सत्कार करण्यात आला.
पीएमपीच्या विजय सूर्यवंशी, दिगंबर मेंगडे, तुकाराम कोल्हे, प्रकाश पाटील, सदानंद जोशी, बबन सोनवणे या कर्मचाऱ्यांचा महापौर दालनात झालेल्या या समारंभास सत्कार करण्यात आला. या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप, नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, आशा सुपे, सदगुरू कदम, प्रमोद ताम्हणकर, सुरेश म्हेत्रे, विमल काळे आदी उपस्थित होते. याशिवाय, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार महापौरांनी केला. नवी सांगवी येथील सचिन घागरे, भोसरीतील प्रियांका उत्तरवार, दिघी येथील प्रीती किरवे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील यशाबद्दल सत्कार झाला. याशिवाय, अक्षय घाणेकर, आदिनाथ घुले, यश काळे, अंजूम शेख, प्रांजली कु ऱ्हाडे, आयुष आगरवाल, गायत्री फडके, सुनील ननावरे, महेश यादव, ज्ञानदेव घोडेकर, रूपेश शेटे, संदीप इंगळे, पूजा कोळेकर, शुभम महाजन, स्वप्नाली घोडके, प्रियांका कदम आदींनाही गौरवण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri to tirupati cycle tour for environment