पिंपरी : शहरवासीयांची तहान भागविणाऱ्या मावळातील पवना धरणात आजमितीला २८.९३ टक्के साठा असून जूनअखेरपर्यंत पुरेल एवढाच हा साठा आहे. गेल्यावर्षीपेक्षा कमी पाणीसाठा असल्याने पावसाने ओढ दिल्यास शहरवासीयांवार पाणी कपातीचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील गृहनिर्माण संस्थांची खासगी टँकरवर भिस्त दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवडला पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मागील साडेचार वर्षांपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शहराचा लोकसंख्यावाढीचा वेग आणि भविष्यातील सन २०४५ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन पालिका आंद्रा व भामा आसखेड धरणातून २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणणार आहे. त्या पाण्यावरील प्रक्रियेसाठी चिखलीत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. आंद्रा धरणातून निघोजे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलून समाविष्ट भागातील नागरिकांना देण्यात येत आहे. परंतु, वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडत असून, तक्रारींमध्ये वाढ होत आहे. पवना धरणात सध्या २८.९३ टक्के पाणीसाठा असून हा साठा जूनअखेरपर्यंत पुरेल एवढा आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला ३०.९२ टक्के पाणीसाठा होता. मागीलवर्षीपेक्षा दोन टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे.

maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
The Meteorological Department has given the forecast of rain in the state of Maharashtra
थंडी सुरू झाली नाही की आता पाऊस येऊन धडकणार…राज्यातील या भागात…
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
Mumbai constituencies polluted, byculla, Shivdi,
मुंबईत चार मतदारसंघ प्रदूषित; भायखळा, शिवडी, देवनार, मानखुर्दच्या समस्येकडे सर्वपक्षिय दुर्लक्ष
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…

हेही वाचा – भोरमध्ये निवृत्त लष्करी अधिकाऱ्याकडून ग्रामस्थांवर गोळीबार

शहरातील अनेक गृहनिर्माण संस्थांना टँकरद्वारे पाणी घ्यावे लागते. प्रतिमाणशी दरडोई १३५ लिटर या निर्धारीत मानकाप्रमाणे पाणी दिले जाते. ज्यांना जास्त पाणी लागते, ते खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी घेत असल्याचा पालिकेचा दावा आहे.

२०२५ पर्यंत दिवसाआडच पाणीपुरवठा

भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठीच्या जलवाहिनीचे काम सन २०२५ पर्यंत पूर्ण होईल. तोपर्यंत पाणीपुरवठा एकदिवसाआडच सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – मावळमध्ये प्रचार खर्चात आघाडीवर बारणे की वाघेरे? कोणी किती केला खर्च?

दिवसाला ६१५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा

पालिका दिवसाला पवना धरणातून ५२०, आंद्रातून ८० आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) १५ असे ६१५ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलते.

धरणात २८.९३ टक्के पाणीसाठा आहे. पावसाला विलंब झाल्यास पाणी टंचाईला सामोरे जावे लागू शकते. शहरी भागात पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश बारिया यांनी केले. तर, विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत काही तक्रारी नाहीत. जूनमध्ये तक्रारी वाढू शकतील. पाणीपुरवठा विस्कळीत झाला तरच टँकरद्वारे पाणी दिले जाते. जास्तीचे पाणी लागते म्हणून खासगी गृहनिर्माण संस्था टँकरद्वारे पाणी घेतात, असा दावा पिंपरी-चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी केला.