पुणे : महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘पिंक ई-रिक्षा’ योजनेसाठी प्रतिसाद वाढला असून, आतापर्यंत ३२५५ महिलांंनी अर्ज केले आहेत. त्यांपैकी ७४४ महिलांंचे अर्ज मंंजूर झाले असून, नवीन वर्षात गुलाबी रिक्षा रस्त्यांंवर धावणार आहेत.

महिला व बालविकास विभागाने ही योजना जाहीर केली असून, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काम रखडले होते. आता पुन्हा अर्जनोंदणी आणि छाननी प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या आठ जिल्ह्यांंतून ३२५५ महिलांनी अर्ज केले आहेत. त्यांपैकी ७४४ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित अर्जांची छाननी सुरू आहे. महिनाअखेर अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने नवीन वर्षापासून गुलाबी रिक्षा रस्त्यावर धावू शकणार आहेत.

Kharadi IT Park, Metro pune,
पुणे : ‘आयटी’तील कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर.. काय आहे मेट्रोचा प्रयत्न ?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Amit Shah on Ambedkar
अमित शाह यांनी आंबेडकरांवर केलेली टिप्पणी वादात? काँग्रेसकडून टीका, माफी मागण्याची मागणी
sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Women jewelery theft Alandi, Women jewelery Alandi,
पुणे : दुचाकीवरील महिलेकडील चार लाखांचे दागिने चोरले, आळंदी रस्त्यावरील घटना
Sharad Pawar and Yugendra Pawar
Sharad Pawar : ५७ वर्षांचा राजकीय प्रवास, बारामती मतदारसंघ अन् पवार घराणं; युगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची भावूक प्रतिक्रिया!
Shaina NC Arvind Sawant
Shaina NC : अरविंद सावंत यांची जीभ घसरली; अपशब्द वापरल्याने शायना एन. सी. संतापल्या, म्हणाल्या, “महिलेला…”

हेही वाचा – पुणे : ‘आयटी’तील कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर.. काय आहे मेट्रोचा प्रयत्न ?

आतापर्यंत पुणे, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर, नागपूर आणि अमरावती या आठ जिल्ह्यांत प्राथमिक स्तरावर ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यांपैकी सर्वाधिक ९६८ अर्ज नागपूर जिल्ह्यातून प्राप्त झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ५६०, पुणे जिल्ह्यातून ३३१, कोल्हापूरमधून ११८, सोलापूर येथून २८५, नाशिकमधून ५३०, अहिल्यानगरमधून ३१६, अमरावती जिल्ह्यातून १४७ असे ३२५५ अर्ज दाखल झाले आहेत.

काय आहे योजना?

महिलांंच्या रोजगारनिर्मितीस चालना मिळावी, तसेच त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी ‘पिंक ई-रिक्षा’ योजना आखण्यात आली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात १७ शहरांंतल्या १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना केवळ १० टक्के रक्कम भरावी लागणार असून, २० टक्के अर्थसहाय्य राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे. बँकेकडून ७० टक्के रक्कम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर अग्रणी बँकांची यादी तयार करण्यात आली आहे. या बँकांसोबत करार करण्यात आले आहेत.

जिल्हा – प्राप्त अर्ज – मंजूर अर्ज

पुणे – ३३१ – ७३
कोल्हापूर – ११८ – ४८
सोलापूर – २८५ – ८६
छत्रपती संभाजीनगर – ५६० – १११
नाशिक – ५३० – २२२
अहिल्यानगर – ३१६ – ५४
नागपूर – ९६८ – १०२
अमरावती – १४७ – ४८
एकूण – ३,२५५ – ७४४

राज्य शासनाच्या निर्देशानुसार ‘पिंक ई-रिक्षा’ योजना १७ जिल्ह्यांंत राबविण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. १० हजार महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत ३२५५ अर्ज आले आहेत. अर्जांची संख्या वाढल्यास लाॅटरी पद्धतीचा अवलंब करून लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. नवीन वर्षात गुलाबी ई-रिक्षा रस्त्यावर धावू शकणार आहेत. – प्रशांत नारनवरे, आयुक्त, महिला व बालविकास विभाग

हेही वाचा – पुणे : दुचाकीवरील महिलेकडील चार लाखांचे दागिने चोरले, आळंदी रस्त्यावरील घटना

लाभार्थी महिलांचे अर्ज प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) भरून घेण्यात येणार आहेत. या रिक्षांसाठी वाहतूक परवाने, चार्जिंग स्थानके, थांबे निश्चित करण्यात आले आहेत. या रिक्षा महिलांंनाच चालविण्याची परवानगी असणार आहे. ‘आरटीओ’कडून लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात येत असून, विशेष परवाने देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. – स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

Story img Loader