पुणे : लोहगाव येथील विमानतळावरून हैदराबादला निघालेल्या प्रवाशाच्या पिशवीतून २८ काडतुसे जप्त करण्यात आली. विमानतळावरील सुरक्षा विभागाने काडतुसे बाळगणाऱ्या प्रवाशाला पकडून पोेलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी प्रवाशाला विमानतळ पोलिसांनी अटक केली.

दीपक सीताराम काटे (वय ३२, रा. सराटी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. याबाबत इंडिगो एअरलाइन्सचे सुरक्षा अधिकारी प्रीती भोसले यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीती भोसले ३ जानेवारी रोजी पावणेअकराच्या सुमारास प्रवाशांच्या पिशव्यांची तपासणी करत होत्या. काटे हे इंडिगो एअरलाइन्सच्या विमानातून हैदराबादला जाणार होते. प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी धातूशोधक यंत्राकडून (मेटल डिटेक्टर) केल्या जाणाऱ्या तपासणीत काटे यांच्या पिशवीत दोन मॅगझीन, तसेच २८ काडतुसे सापडली. याबाबत काटे यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. त्यांनी काडतुसे का बाळगली? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप करपे तपास करत आहेत.

shirur Deputy Superintendent of Police Prashant Dhole village security police efficiency
ग्राम सुरक्षा पथके प्रभावीपणे कार्यरत करावित – पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले
15th april deadline extra marks proposals 10th 12th examination
दहावी-बारावीच्या वाढीव गुण, प्रस्तावांसाठी १५ एप्रिलची मुदत… निकाल…
pune The indus Entrepreneurs 'Hycon 2025' conference
उद्योग यशस्वी करण्याचा गुरुमंत्र जाणून घ्या! ‘टीआयई’तर्फे ‘टायकॉन २०२५’ परिषदेचे आयोजन
additional charge for post in savitribai phule pune university
विद्यापीठात आणखी एका पदाचा भार ‘प्रभारी’वर; परीक्षा विभागाचाही अतिरिक्त कार्यभार
promising picture of business opportunities,in Pune
जगभरात मंदीचे वारे असताना पुण्यातील उद्योग मात्र आशेवर स्वार!
Youth cheated of Rs 5 lakhs with the lure of a job in the army
लष्करात नोकरीच्या आमिषाने तरुणांची पाच लाखांची फसवणूक
GBS cases rises in Maharashtra,
GBS Updates : ‘जीबीएस’मुळे मृत्यूची मालिका सुरुच; राज्यातील रुग्णसंख्या २०३ वर पोहोचली
PMPML in financial crisis
पीएमपीएमएल ची तूट ७६६ कोटींवर! दहा वर्षांत सात पटींनी वाढ
Pune Municipal Corporation 75th Anniversary news in marathi
महापालिकेचा अमृत महोत्सव चहा पाण्यावरच ! अमृतमहोत्सवाचा महापालिका प्रशासनाला विसर, कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी
Story img Loader