पुणे : देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने कात्रज परिसरात पकडले. त्याच्याकडून पिस्तुल आणि एक काडतुस जप्त करण्यात आले.
संकेत मिलिंद गोवेकर (वय २२, रा. कोरेगाव, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गोवेकरच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तो कात्रज तलावाजवळ थांबला अशून त्याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तुल आणि काडतुस सापडले. सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक निरीक्षक अभिजीत पाटील, विकास जाधव, यशवंत ओंबासे, मधुकर तुपसौंदर, संजय भापकर, गजानन सोनवलकर आदींनी ही कारवाई केली.