लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना सिंहगड रस्ता भागात पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून देशी बनावटीची चार पिस्तूल, आठ काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

Firing at the house of an independent candidate in Jalgaon news
जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
pune four pistols and two bikes seized
कोंढव्यात तिघांकडून चार पिस्तुले, दोन दुचाकी जप्त
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
Police raid unauthorized bar in Ghatkopar and rescue eight bar girls Mumbai news
घाटकोपरमध्ये अनधिकृत बारवर पोलिसांचा छापा; आठ बारबालांची सुटका

सिद्धेश संतोष पाटील (वय २८, मूळ रा. केंबुर्ली, ता. महाड, जि. रायगड), विकास सुभाष सावंत (वय २६, मूळ रा. सावंतवाडी, केज, ता. बीड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पाटील आणि सावंत सिंहगड रस्ता भागातील जाधवनगर परिसरात राहायला आहेत. दोघांकडे पिस्तूल आणि काडतुसे असल्याची माहिती सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी देवा चव्हाण, सागर शेडगे यांना मिळाली होती.

आणखी वाचा-नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; दोघांचा मृत्यू

दोघेजण पिस्तूल विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लाळवून हिंगणे खुर्द परिसरात कॅनोल रस्त्यावर सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून चार पिस्तूल, आठ काडतुसे जप्त करण्यात आली. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे शाखेचे निरीक्षक जयंत राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक गणेश मोकाशी, संजय शिंदे, राजू वेगरे, देवा चव्हाण, सागर शेडगे, विकास पांडोळे, अमोल पाटील आदींनी ही कारवाई केली.