पुणे : दिवाळीतील टिकल्या वाजविण्याचे पिस्तूल उगारुन दहशत माजविण्याची घटना नुकतीत मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील वडगाव पूल परिसरात घडली. याबाबतची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी दहशत माजविणाऱ्या तरुणांचा शोध घेतला. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.

अक्षय अंकुश गायकवाड (वय २७, रा. स्नेह विहार सोसायटी, दांगट पाटील नगर, शिवणे, एनडीए रस्ता), सुनील चंद्रकांत शिंदे (वय २८, रा. रामनगर, वारजे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहे. त्यांच्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील यांनी फिर्याद दिली आहे. बाह्यवळण मार्गावरील वडगाव ते वारजे पूल भागातून गुरुवारी (३१ ऑक्टोबर) दोघे जण दुचाकीवरुन निघाले होते. दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाने त्याच्याकडील पिस्तूल दाखवून दहशत माजविण्याचा प्रकार केला होता. याबाबतची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाली होती. पिस्तुलाचा धाक दाखवून सहप्रवासी तरुण वाहनचालकांना शिवीगाळ करत असल्याचे चित्रफित दिसून आले होते.

Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

हेही वाचा – आरटीई, राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील अध्यापन तासांमध्ये विसंगती… झाले काय, होणार काय?

हेही वाचा – शहरभर फटाक्यांची तुफान आतषबाजी… हवेची गुणवत्ता खालावली…

संबंधित चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर सिंहगड रस्ता पोलिसांनी दुचाकीवरील दोघांचा शोध घेतला. पोलिसांनी गायकवाड आणि शिंदे यांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी धमकाविण्यासाठी वापरलेले पिस्तूल दिवाळीतील टिकल्या वाजविण्याचे असल्याचे उघड झाले. दिवाळीतील टिकल्या वाजविण्याचे पिस्तूल दोघांनी बाळगले होते. खोटे पिस्तूल बाळगून दहशत माजविल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अलाा, असे सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांनी सांगितले.

Story img Loader