पुणे : पंजाबी गायक, काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधव याच्या टोळीतील सात जणांना व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून देशी बनावटीची तेरा पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. जाधवच्या टोळीतील दोन साथीदारांनी मध्यप्रदेशातील मनवर येथून पिस्तुले आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा >>> ‘अग्निपथ योजनेतून तरुणांची टिंगलटवाळी’, छगन भुजबळांची केंद्र सरकारवर टीका

husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
supreme court ask government for treatment of bedridden youth
तरुणाच्या कुटुंबीयांसाठी सर्वोच्च न्यायालय मदतीला; अकरा वर्षांपासून अंथरुणाशी खिळलेल्या तरुणावर आता सरकारी उपचार
Bangladesh citizens Ratnagiri, Anti-Terrorism Squad,
रत्नागिरीत तेरा बांगलादेशी घुसखोरांना पकडले, दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई
Baba Siddique murder case, Five people in police custody, Baba Siddique news, Baba Siddique latest news,
पाच जणांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण
terrorist 44 killed during the year in jammu region
जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार

या प्रकरणी जाधवचे साथीदार जीवनसिंग दर्शनसिंग नहार (वय २३, रा. मंचर), श्रीराम रमेश थोरात (वय ३२, रा. मंचर), जयेश रतीलाल बहिराम (वय २४, रा. घोडेगाव), वैभव उर्फ भोला शांताराम तिटकारे (वय १९, रा. जळकेवाडी, चिखली), रोहित विठ्ठल तिटकारे (वय २४, रा. सरेवाडी, नायफड), सचिन बबन तिटकारे (वय २२, रा. धाबेवाडी, नायफड), जिशान इलाइबक्श मुंढे (वय २०, रा. घोडेगाव) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात नारायणगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा >>> Legislative Council Elections :…आता चमत्कार कुणाबाबत घडतोय, हे अवघा महाराष्ट्र बघेल – अजित पवारांचं विधान

खंडणी प्रकरणी नारायणगावमधील एका व्यावसायिकाने फिर्याद दिली होती, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. जाधव याने पाच ते सहा महिन्यांपूर्वी या व्यावसायिकाला समाजमाध्यमातील दूरध्वनी सेवेचा वापर करुन पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. घाबरलेल्या व्यावसायिकाने तक्रार दिली नव्हती. त्यानंतर जाधवने पुन्हा व्यावसायिकाकडे खंडणी मागितली होती. जाधवने साथीदाराला व्यावसायिकाकडे पाठविले होते. त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मुसेवाला हत्या प्रकरणात जाधवला अटक करण्यात आल्याचे समजल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पुणे : वाढदिवसाला टोळक्याची दहशत, कोयते नाचवत वाहनांवर केली दगडफेक

पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर जाधवच्या साथीदारांना अटक करण्यात आली. न्यायालायाने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपी जयेश बहिराम आणि एकाला मध्यप्रदेशातील मनवर येथून पिस्तुले आणण्यासाठी जाधवने पाठविले होते. आरोपींकडून पिस्तुलांसह, आठ मोबाइल संच, मोटार जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> विधान परिषद निवडणूक: केंद्रीय तपास यंत्रणांकडून मविआच्या आमदारांना फोन, नाना पटोलेंचे गंभीर आरोप

मुसेवालांच्या हत्येनंतर पिस्तुल खरेदी

मुसेवाला यांच्या हत्येनंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आरोपी जयेश बहिराम आणि साथीदारांनी मध्यप्रदेशातून पिस्तुले आणली. जाधवचा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी थेट संबंध आहेत. खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या जाधव टोळीतील सात जणांची चौकशी करण्यात येत आहे. त्याने पिस्तुले कशासाठी आणली, त्यांचा बिष्णोई टोळीशी संबंध आहे का ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांच्या नावाचे बनावट व्हॉटसॲप खाते; राजकीय व्यक्तींसोबत नागरिकांना मेसेज पाठवल्याने खळबळ

तक्रार करण्याचे आवाहन

दरम्यान, संतोष जाधव आणि साथीदारांनी आणखी काही व्यावसायिकांकडे खंडणी मागितल्याचा संशय आहे. जाधव टोळी विरोधात न घाबरता तक्रार करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॅा. अभिनव देशमुख यांनी केले आहे.