सराईत गुन्हेगार निलेश गायवळ व अन्य दोघांचे फलक लावल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत चांदणी चौकात पाइपलाइन हायवे रोड लगत निलेश गायवळ याचे तसेच इतर दोघांचे वाढदिवसानिमीत्त अनधिकृत फलक लावण्यात आले होते. हिंजवडी पोलीस आणि पुणे महापालिका बावधन क्षेत्रीय कार्यालय यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करून हे अनधिकृत फलक काढून टाकले आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
निलेशभाऊ गायवळ युथ फाउंडेशनचे सदस्य व अन्य दोघांवर अनधिकृत फलक लावल्याप्रकरणी कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालययाचे परवाना निरीक्षक निलेश काळुराम घोलप यांनी फिर्याद दिली आहे़.हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
First published on: 17-03-2023 at 15:59 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Placard of criminal nilesh gaiwal in hinjwadi pune print news ggy 03 amy