विधी विद्याशाखेतील विद्यार्थ्यांच्या लढय़ाला यश
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : वापरलेल्या कंडोमची विल्हेवाट लावण्यासाठी काही उत्पादक कंपन्यांनी आता कंडोबसोबत पाकिटामध्ये प्लास्टीकच्या छोटय़ा पिशव्या देण्यास सुरुवात केली आहे. कंडोम मोकळ्या जागेत तसेच कचऱ्यात टाकले जात असल्याने त्यामुळे सामाजिक आरोग्यास धोका होण्याची शक्यता असल्याचे सांगत पुण्यातील विधी विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याच मागणीसाठी याचिका दाखल केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या या लढय़ाला काही प्रमाणात यश मिळाले आहे.
कंडोम उत्पादक कंपन्यांनी कंडोमचे विघटन कशाप्रकारे करावे याची माहिती पाकिटावर द्यावी, कंडोमची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र पाकिट द्यावे. वापरलेले कंडोम हा अविघटनशील कचरा म्हणून गृहीत धरावा. त्याचप्रमाणे वर्गीकरण आणि प्रक्रिया करून वापरलेले कंडोम नष्ट करावेत, अशी मागणी करणारी ही याचिका लॉयर्स फॉर अर्थ जस्टीसच्या सदस्य आणि विधी महाविद्यालयाचे निखिल जोगळेकर, बोधी रामटेके, ओमकार केणी, शुभम बिचे आणि वैष्णव इंगोले या विद्यार्थ्यांच्या वतीने अडॅ. असीम सरोदे यांनी ही याचिका दाखल केली आहे.
याचिकेवर पहिली सुनावणी घेताना न्यायाधिकरणाने या बाबत सर्व कंडोम उत्पादक कंपन्यांसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण आणि वन मंत्रालय, जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग आणि शहरी विकास मंत्रालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांना न्यायाधिकरणापुढे उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुण्यातील न्यायाधिकरणाचे कामकाज बंद झाल्याने या याचिकेवर अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, न्याधिकरणाचे हे प्रकरण गंभीररीत्या घेतल्याने काही कंपन्यांनी याचिकाकर्त्यांच्या मागणीनुसार कंडोमच्या पाकिटात पिशव्या देणे सुरू केले असून, पाकिटावर विल्हेवाटीबाबत संदेशही छापण्यात आला आहे.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे दाखल केलेल्या याचिकेनुसार बहुराष्ट्रीय कंपन्यांनी कंडोमच्या विल्हेवाटीसाठी पाकिटात प्लास्टीकच्या पिशव्या देणे सुरू केले आहे. मात्र, सर्वच कंपन्यांनी हे करणे आवश्यक आहे. पुढील टप्प्यामध्ये कचरा वेचकांनाही हा कचरा वेगळा काढण्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे याबाबत नागरिकांमध्येही प्रबोधन होणे गरजेचे आहे.
– अॅड. असीम सरोदे