औंध जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला आमदार आश्विनी लक्ष्मण जगताप यांनी चांगलंच खडसावले आहे. परिचारिकेच्या चुकीमुळे दोन रुग्णांना अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागले. रुग्णांची प्रकृती अधिक खालावली होती. अखेर ही बाब चिंचवडच्या आमदार आश्विनी लक्ष्मण जगताप यांना समजताच त्यांनी औंध जिल्हा रुग्णालय गाठून घटनेची माहिती घेत हलगर्जीपणा करणाऱ्या परिचारिका आणि डॉक्टरला खडसावले आणि कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

औंध जिल्हा रुग्णालय हे नेहमीच चर्चेत असत. अनेक तक्रारी थेट चिंचवडच्या आमदार आश्विनी लक्ष्मण जगताप यांच्यापर्यंत गेल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या दोन रुग्णांना परिचारिकेच्या चुकीमुळे चांगलंच सहन करावे लागले. त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. झालं असं की, दोन्ही रुग्णांना रक्त तपासून एकाला ‘ए’ पॉझिटिव्ह तर दुसऱ्या रुग्णाला ‘बी’ पॉझिटिव्ह रक्त चढवायचे होते. रक्त चढवणारी परिचारिका फोनवर बोलत असल्याने झालं उलट. ‘ए’ वाल्याला ‘बी’ आणि ‘बी’ वाल्या रुग्णाला ‘ए’ पॉझिटिव्ह रक्त चढवण्यात आले. यामुळे दोन्ही रुग्णांची प्रकृती अधिकच खलावली.

हेही वाचा – शिंदे गटाचे खासदार माने – मंडलिक यांच्यासाठी संघर्ष कायम

हेही वाचा – वंचितच्या भूमिकेने औरंगाबादमध्ये ठाकरे गटात चलबिचल

हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?

रुग्णांना थेट अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करावे लागले. याबाबतची माहिती आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना समजताच त्यांनी रुग्णांची विचारपूस करण्यासाठी औंध जिल्ह्या रुग्णालय गाठलं. नातेवाईकांसमोर डॉक्टरांना बोलवून घेऊन चांगलंच झापले. असे प्रकार होतातच कसे? असा प्रश्न विचारत रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला, असे म्हणत संबंधित परिचारिकेवर कडक कारवाई करण्याचे आदेश आमदार आश्विनी लक्षण जगताप यांनी औंध जिल्हा रुग्णालय प्रशासनाला दिले. या घटनेमुळे औंध जिल्हा रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिका कशा प्रकारे उपचार करत असतील याचा प्रत्येय येतो. घटनेतील परिचारिकेवर कारवाई करणं गरजेचं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Playing with the lives of patients in aundh district hospital mla ashwini laxman jagtap scolded the doctor kjp 91 ssb