इंटरनॅशनल असोसिएशन फॉर परफॉर्मिंग आर्टस अँड रीसर्चतर्फे (आयपार) १ ते ६ नोव्हेंबर दरम्यान ‘आयपार’ आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात भारतासह बुर्किना फासो, जर्मनी, इटली, मंगोलिया आदी देशांतील वैविध्यपूर्ण नाट्य प्रयोगांची मेजवानी नाट्यप्रेमींना मिळणार असून, महोत्सवात विविध कार्यशाळा, नाट्यवाचन सत्रे, चर्चासत्रेही होतील.

हेही वाचा >>>दारु पिताना झालेल्या वादातून चुलतभावाचा खून; एकाला अटक

Akshata and sudha Murthy in Jaipur Literature Festival
जयपूर साहित्य महोत्सव : संवाद हाच पालक आणि मुलांमधला महत्त्वाचा दुवा – अक्षता मूर्ती
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Which festival will be celebrated in February
February Festival 2025: फेब्रुवारी महिन्यात कोणते सण कोणत्या दिवशी साजरे केले जाणार? जाणून घ्या गणेश जयंती, महाशिवरात्री अन् एकादशीची तारीख; पाहा संपूर्ण यादी…
All-party meetings in Parliament
अर्थअधिवेशन आजपासून, पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत; अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता
Crowd of devotees take bath in Ramkund due to Mauni Amavasya
नाशिक : मौनी अमावास्येमुळे रामकुंडात स्नानासाठी भाविकांची गर्दी
सतीश आळेकर यांना ‘जनस्थान’; १० मार्च रोजी नाशिकमध्ये पुरस्काराने गौरव
Food and Drug Administration, Food Security,
अन्न सुरक्षेचा १०० दिवसांचा कृती आराखडा, अन्न व औषध प्रशासनाकडून विविध उपक्रम हाती
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh 2025 : महाकुंभ मेळ्यात १०० हून अधिक भाविकांना हृदविकाराचा झटका; प्रशासनाच्या तयारीमुळे वाचले प्राण

आयपारचे संचालक प्रसाद वनारसे यांनी ही माहिती दिली. यंदा या महोत्सवाचे सातवे वर्ष आहे. महोत्सवातील नाट्यप्रयोग ‘द पुणे स्टुडिओ’ आणि ‘द बेस’ येथे होतील. १ नोव्हेंबरला ‘ब्रोकन इमेजेस’ या मंगोलियन नाटकाने महोत्सवाचा प्रारंभ होईल. २ नोव्हेंबरला बुर्किना फासो येथील ‘द ऑटोप्सी’ हे नाटक, पाँडिचेरी येथील आदिशक्ती संस्थेचे ‘भूमी’ हे नाटक, ४ नोव्हेंबरला कोलकात्याच्या आमटा परिसरच संस्थेचे ‘सावित्री’ हे नाटक, जर्मनीतील ‘२६६६’ हे नाटक, ६ नोव्हेंबरला इटलीतील ‘मेड इन इल्व्हा’ अशी नाटके सादर होतील. तसेच या महोत्सवादरम्यान कुमार जोशी स्मृतिप्रीत्यर्थ नाट्यवाचन स्पर्धेमधील निवडक संघांचे नाट्यवाचनही होईल.

हेही वाचा >>>पुणे : रोडावणारा वाङ्मयीन व्यवहार ही चिंतेची बाब – डाॅ. सुधीर रसाळ

महोत्सवाद्वारे जगभरातील रंगकर्मींना एकत्र येण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. भारतातील युवा रंगकर्मींना समकालीन जागतिक रंगभूमीवरील घडामोडींचा अनुभव घेता येतो, अन्य संस्कृतींमधल्या कलावंतांशी संवाद साधण्याची संधी मिळते, असे वनारसे यांनी सांगितले.

विविध सत्रांमध्ये मान्यवरांचा सहभाग
महोत्सवात नाटक या माध्यमाच्या अनुषंगाने विविध सत्रे, कार्यशाळांमध्ये मान्यवर रंगकर्मी मार्गदर्शन करणार आहेत. त्यात ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक प्रा. रामगोपाल बजाज, श्रीरंग गोडबोले, विभावरी देशपांडे, शुभेन्दू भंडारी, जर्मनीतील लुट्स हुब्नर, योलांडा मोरालेस हर्नांदेझ, इंडोनेशियातील मुंखचिमेग म्यागमरजाव्ह, डॉ. समीर दुबळे, बुर्किना फासो येथील हमाडू मांडे, नोंगोदो वॉड्रॉगो, यासिन्थे काब्रे, इटलीतील निकोला पीएन्झोला, आना डोरा डोर्नो आदींचा सहभाग आहे.

Story img Loader