पुणे : कोथरुड भागात पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांचा दुचाकींमध्ये स्फोटके ठेवून स्फोट करण्याचा डाव होता, असे ‘एनआयए‘च्या तपासात आढळून आले आहे. या दहशतवाद्यांचा पुण्यात कोठे वावर होता, याची माहिती घेण्यात येत असून, त्यांच्याबरोबर असलेल्या पसार साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.

महंमद युनूस महंमद याकू साकी (वय २४) आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय २३, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) या दहशतवाद्यांना कोथरूड पोलिसांच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री अटक केली. त्यांचा म्होरक्या महंमद शहनवाज आलम (वय ३१) पसार झाला आहे.. साकी आणि खान आयसीस या दहशतवादी संघटनेची उपसंघटना ‘सुफा’शी संबधित असून, ते जयपूर येथे बाँबस्फोट घडविण्याच्या तयारीत होते. स्फोटके बाळगल्याप्रकरणी एनआयएने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ते पसार झाले होते.  दीड वर्षांपासून ते कोंढव्यात वास्तव्यास होते.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत

कोथरूड भागातील शास्त्रीनगर परिसरात दुचाकी चोरताना दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. दहशतवादी दुचाकीत स्फोटके ठेवून बाॅबस्फोट घडविणार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी दहा जुलै २०१४ रोजी शहराच्या मध्यभागातील फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारात दुचाकीत स्फोटके ठेवून स्फोट घडविण्यात आल्याची घटना घडली होती. याबाबत एनआयए, एटीएस, तसेच पुणे पोलिसांकडून दहशतवाद्यांची चौकशी करण्यात येत आहे. एनआयएच्या पथकाने शुक्रवारी कोथरुड भागास भेट दिली. खान आणि साकी कोंढव्यात ज्या भागात राहायला होते. त्या भागाचीही पाहणी एनआयएच्या पथकाने केली.

भाडेकरुंची नोंद करण्यास टाळाटाळ

इम्रान खान आणि युनूस साकी कोंढवा भागात भाडेतत्वावर राहत होते. दोघे ग्राफिक्स डिझायनर म्हणून वावरत होते. दोघांची माहिती घरमालकाला नव्हती. घरमालकाने त्यांच्याशी भाडेकरार केला नव्हता. कोंढवा पोलीस ठाण्यात भाडेकरुंची नोंद घरमालकाने केली नसल्याचे तपासात उघडकीस आले आहे. शहरातील अनेक घरमालक भाडेकरुंची माहिती पोलिसांना देत नाही. भाडेकरुंची नोंद न केल्यास पोलिसांनी घरमालकांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा दिला होता. सुरुवातीला घरमालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई बारगळल्याने पोलिसांना आता भाडेकरु नोंदणी माेहीम राबवावी लागणार आहे.