राज्यात शहरी भागामध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पांवर आता महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) तांत्रिक कक्षाचे नियंत्रण राहणार आहे. गृहप्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी आणि विविध प्रकारच्या परवानगी देण्यासाठी या तांत्रिक कक्षाची व्याप्ती वाढविण्यात आली असून खासगी भागीदारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), सिडको यापैकी कोणत्याही प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पांमधील सदनिकांची तपासणी म्हाडाच्या तांत्रिक कक्षाकडून केली जाणार आहे.

केंद्र सरकारने सन २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पंतप्रधान आवास योजना ही जून २०१५ पासून सुरू केली आहे. या योजनेला केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. या योजनेंतर्गत शहरी भागात उभारण्यात येणारे गृहप्रकल्प म्हाडासह अन्य स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्राधिकरणांकडून बांधण्यात येत असतात. या योजनेला गती देण्यासाठी ; तसेच या योजनेवर नियंत्रण ठेवणे आणि प्रस्ताव सादर करताना सुसूत्रता आणण्यासाठी राज्य सरकारने प्रचलित कार्यपद्धतीत बदल केला आहे.

maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?
Assembly Elections 2024 Akkalkuwa-Akrani Assembly Constituency Congress
लक्षवेधी लढत: अक्कलकुवा: लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार का?
Devendra Fadnavis Constituency, Sachin Waghade,
फडणवीसांच्या मतदारसंघातील उमेदवार म्हणतो, “मी बेरोजगार, मला मत द्या…”
Extravagance of one lakh crores by rulers party in state Priyanka Chaturvedis allegation
राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून एक लाख कोटीची उधळपट्टी, ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचा आरोप
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !
maharashtra assembly election 2024, Mahayuti Campaign, Palghar, Dahanu,
महायुतीच्या प्रचारात गुजरातमधील निरीक्षकांची देखरेख

सद्य:परिस्थितीत प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रकल्पांना म्हाडाकडून मान्यता देण्यात येते. या प्रकल्पांना ना हरकत प्रमाणपत्र आणि देकार पत्रे दिली जातात. मात्र, या प्रक्रिया त्रास सहन करावा लागतो. आता सर्व परवानगी आणि तपासणीचे अधिकार हे म्हाडाच्या तांत्रिक कक्षाला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

या योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या हिश्शाचे वितरण करताना राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे. निधी वितरणाचे प्रस्तावदेखील तांत्रिक कक्षाच्या अहवालासह राज्य सरकारच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहेत. राज्य सरकारने निधी वितरणाबाबत आदेश दिल्यानंतर पुन्हा पंतप्रधान आवास योजना कक्षाकडे याबाबतचे प्रस्ताव न पाठविता आता म्हाडाच्या तांत्रिक कक्षाकडून २४ तासांमध्ये निधीचे संबंधितांना वितरण होणार आहे. त्यामुळे निधी वितरणातील विलंब टळणार असल्याचे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले.

पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती

या योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांची गुणवत्ता योग्य आहे किंवा कसे, याची तपासणी म्हाडाच्या तांत्रिक कक्षामार्फत केली जाणार आहे. त्यासाठी या कक्षाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. या कक्षामध्ये आता एक मुख्य अभियंता, दोन कार्यकारी अभियंते, दोन उप अभियंते यांच्या नेमणुका केल्या जाणार आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक गृहप्रकल्पावर नियंत्रण; तसेच सदनिकांची तपासणी केली जाणार असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले.