पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंगळवारी सकाळी पुण्यात आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन, कसा आहे पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा?
लोहगाव विमानतळावरून मोदी हे हेलिकॉप्टरने कृषी महाविद्यालय परिसरात तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर उतरतील. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडे प्रयाण करणार आहेत. ‘श्रीं’ची आरती, अभिषेक उरकल्यानंतर मोदी टिळक राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमाकडे रवाना होतील. त्यानंतर दुपारी शिवाजीनगर येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन, लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
First published on: 01-08-2023 at 12:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi pune visit pm modi arrive in pune pune print news psg 17 ssb