PM Modi Pune Visit Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पूजा आणि अभिषेक, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आणि विविध विकासकामांचे भूमीपूजन, लोकार्पण असा पंतप्रधान मोदी यांचा दौरा आहे. याशिवाय दौऱ्याच्या अखेरीस दिल्लीला प्रयाण करण्यापूर्वी निमंत्रित सहा मोठ्या उद्योगपतींशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत. त्याकरिता खास वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान मोदी यांचे पुण्यात आगमन झाल्यानंतर प्रथम ते दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाणार आहेत. त्यानंतर टिळक पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रम आणि त्यानंतर शिवाजीनगर येथील विविध विकासकामांच्या भूमीपूजन, लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. त्यानंतर दिल्लीकडे प्रयाण करण्यापूर्वी निवडक उद्योगपतींशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत. या संवादात विकास दर, रोजगाराच्या संधी वाढविण्याचे उपाय, देशाची अर्थव्यवस्था आदींबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

हेही वाचा – PM Modi Pune Visit : पंतप्रधान मोदींच्या पुणे भेटीमुळे मेट्रोच्या कामाला ‘ब्रेक’

अर्थव्यवस्थेची वास्तविकता जाणून घेण्यासाठी पंतप्रधान मोदी उद्योगपतींशी संवाद साधणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्मिती, लष्करी साहित्य उत्पादन अशा क्षेत्रात पुणे जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) पुढील कार्यकाळात जगात तिसऱ्या स्थानी नेण्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी नुकताच व्यक्त केला आहे. त्यासाठी उद्योगांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार असल्याने पुण्यातील उद्योजकांशी पंतप्रधान साधणार असलेला संवाद महत्त्वाचा ठरणार आहे.

हेही वाचा – पुणे : मंडईतील लोकमान्यांच्या पुतळ्याचे शताब्दी वर्षात पदार्पण, जाणून घ्या या पुतळ्याचा इतिहास

पुण्यातील उद्योगांचा आढावा

पुणे जिल्ह्यातील विविध उद्योगांची संख्या दोन लाख ३४ हजार ६७७ असून, साडेसोळा लाख कामगार आहेत. त्यामध्ये मोठे उद्योग ६७७ आणि लघु, मध्यम व सेवा उद्योगांची संख्या दोन लाख ३४ हजार एवढी आहे. ४५० मोठे आणि नोंदणीकृत लहान १४०० माहिती तंत्रज्ञान युनिट आहेत. हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्कमध्ये १४६, तर इतर ठिकाणी ७२ माहिती तंत्रज्ञान युनिट आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi pune visit pm modi will meet six big industrialists pune print news psg 17 ssb