पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देहू येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी वारकरी तसेच जमलेल्या जनतेस संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी भारतीय संस्कती, संतपरंपरेबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच त्यांनी भारत देशाची प्रगती आणि सध्या सुरु असलेल्या विकासकामांवर भाष्य केले. जाणून घेऊया मोदी यांच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे
१) काही महिन्यांपूर्वी मला पालखी मार्गावर दोन राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य लाभले होते. ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे निर्माण पाच टप्प्यात तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम तीन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे.या पूर्ण कामात ३५० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा मार्ग तयार केला जाणार आहे. या कामासठी ११ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे, असे मोदी म्हणाले.
हेही वाचा >>> देशात महागाईचा भडका; घाऊक महागाई दर १५.८८ टक्क्यांवर; गेल्या ९ वर्षातील उच्चांक
२) तुकाराम महाराजांनी ज्या शिळेवर १३ दिवसांपर्यंत तपश्चर्या केली ती शिळा त्यांच्या वैराग्याची साक्षीदार झालेली आहे. मी ही शिळा म्हणजे भक्ती आणि ज्ञानाचा आधार असल्याचे मानतो. देहू येथील शिळामंदिर फक्त भक्तीच्या शक्तीचे केंद्र नसून त्यामळे भारताचे सांस्कृतिक भविष्य प्रशस्त होणार आहे, असे मोदी म्हणाले.
हेही वाचा >>> “…म्हणून आपले पंतप्रधान खऱ्या अर्थाने वारकरी”; PM मोदींच्या देहू दौऱ्यात फडणवीसांचे उद्गार
३) देश आपल्या स्वातंत्र्यांचा अमृतमोहत्सव साजरा करत आहे. आपण जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहोत. याचे श्रेय भारत देशातील संत परंपरा तसेच ऋषींना आहे. भारत ही संतांची भूमी असल्यामुळे हा देश शास्वत आहे. प्रत्येक युगामध्ये आपल्याकडे देश तसेच समाजाला दिशा देण्यासाठी कोणीतरी महान व्यक्ती आलेला आहे. आज देश संत कबीरदास यांची जयंती साजरी करतोय. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे हे ७२५ वे वर्ष आहे. या महान व्यक्तींनी आपल्या शास्वततेला सुरक्षित केलं. भारताला गतीशील ठेवलं.
हेही वाचा >>> दीड वर्षात १० लाख पदांच्या भरतीबाबत मोदी सरकारच्या निर्णयावर ओवेसींची टीका, म्हणाले…
४) संत तुकाराम महाराज यांच्यातील दया, करुणा तसेच सेवा त्यांच्या अभंगांच्या रुपात आजही आपल्यासोबत आहे. या अभंगांनी आपल्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. ज्याचा भंग होत नाही. जो वेळेनुसार शास्वत आणि प्रासंगिक असतो तोच अभंग असतो. संत तुकाराम यांचे अभंग आपल्याला उर्जा देत आहेत. मार्ग दाखवत आहेत. संत नामदेव, संत एकनाथ, संत सावता महाराज, संत नरहरी महाराज, संत सेना महाराज, संत गोरोबाकाका, संत चोखामेळा यांच्या अभंगांमधून आपल्याला नव्याने प्रेरणा मिळते.
हेही वाचा >>> पंतप्रधान मोदींचा देहू दौरा : काळे कपडे घालून येणाऱ्यांना सभास्थळी नो एन्ट्री
५) आज येथे संत चोखामेळा तसेच त्यांच्या परिवाराने रचलेल्या सार्थ अभंग गाथेचे प्रकाशन करण्याचे मला सौभाग्य लाभले. या सार्थ अभंग गाथेमध्ये संत परिवाराच्या ५०० पेक्षा जास्त अभंग रचनांना सोप्या भाषेत अर्थासहित सांगण्यात आले आहेत.
६) संत तुकाराम सांगायचे की समाजात उच्च नीचतेचा भेदभाव करणे हे पाप आहे. त्यांचा हा उपदेश भक्तीसाठी जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच हा उपदेश राष्ट्रभक्ती तसेच समाजभक्तीसाठी महत्त्वाचा आहे.
हेही वाचा >>> अग्निपथ योजने’ची संरक्षण मंत्र्याकडून घोषणा; तरुणांना मिळणार तिन्ही सैन्य दलात सेवेची संधी
७) आज देश सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मंत्रावर चालतो आहे. सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ कोणताही भेदभाव न करता सर्वांनाच मिळतोय. देशात महिला सबलीकरणासाठी प्रयत्न केला जातोय. पंढरपूरची वारी ही संधीच्या समानतेचं प्रतिक आहे.
हेही वाचा >>> ‘केजरीवाल भगवंत मान यांना दारूचे बॉक्स पाठवतात’; अकाली दल प्रमुखांचा मोठा आरोप
८) संत तुकाराम महाराज म्हणायचे की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणेज समजात शेवटी बसलेल्या व्यक्तीला आपले समजून त्यांचे कल्याण करणे हेच संताचे लक्ष्य आहे. हाच देशासाठी संकल्प आहे. हाच संकल्प घेऊन देश पुढे जातोय. दलित, आदिवासी, मजूर यांचे कल्याण करणे ही प्राथमिकता आहे.
हेही वाचा >>> National Herald: पोलीस कर्मचाऱ्याने रोखताच काँग्रेस नेत्याने काढला पळ; ट्रोल होऊ लागल्यानंतर शेअर केला व्हिडीओ, म्हणाले…
९) संत भिन्न परिस्थितीत समजाला गती देण्यासाठी पुढे येतात. शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांच्या जीवनात तुकाराम महाराजांसारख्या संतानी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकांना शिक्षा झाली. तेव्हा ते तुरुंगात तुकाराम महाराजांचे अभंग गात असत. वेगवेगळा कालखंड वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. मात्र या सर्वांसाठी संत तुकाराम यांची वाणी आणि उर्जा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेली आहे.
हेही वाचा >>> येत्या दीड वर्षात मिळणार १० लाख सरकारी नोकऱ्या; पंतप्रधान मोदींनी दिल्या सूचना
१०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचतीर्थांचा विकास झाला आहे. आंबेडकर यांचे जन्मस्थळ असलेले महू असेल किंवा लंडमधील त्यांच्या घराचे स्मारकात रुपांतर, मुंबईतील चैत्यभूमीचे काम, नागपूरमधील दीक्षाभूमीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर विकसित करण्याचे काम असो किंवा दिल्लीमधील महापरिनीर्वाण झालेल्या ठिकाणी मेमोरियलचे निर्माण असेल हे पंचतीर्थ नव्या पिढीला बाबासाहेबांची ओळख करुन देत आहेत.