पुणे : पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोलॅबोरेटिव्ह रिस्पॉन्स (पीपीसीआर) आणि पुणे महानगरपालिका यांच्यातर्फे कसबा-विश्रामबागवाडा परिसरात शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी ‘माझे पुणे, स्वच्छ पुणे’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रणाली आणि माहिती, शिक्षण आणि संपर्काच्या माध्यमातून परिसर स्वच्छता, नागरिकांमध्ये स्वच्छतेच्या जबाबदारी जाणीव निर्माण करण्याचा उद्देश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे : फेरीवाला दिसताच रेल्वेचा दंडुका! दीड महिन्यांत ७४ जणांवर कारवाई

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत केसरीवाडा येथे झालेल्या कार्यक्रमात ‘माझे पुणे, स्वच्छ पुणे’ मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. महापालिका आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत, पीपीसीआरचे डॉ. सुधीर मेहता, आशिष भंडारी, राजीव खेर, इंद्रनील चितळे, मनोज पोचट, डॉ. रवी पंडित, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सुर्यवंशी आणि स्वच्छ भारत मिशनसाठी सदिच्छादूत डॉ. सलील कुलकर्णी, रुतुजा भोसले आदी या वेळी उपस्थित होते. पुढील वर्षभर ही मोहीम जनवाणी आणि सोशल लॅब यांच्यातर्फे राबवली जाणार आहे. कचऱ्याचे संकलन, कचरा वर्गीकरण, कचऱ्याचे ढीग नाहीसे करणे ही योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. मोहिमेच्या माध्यमातून सुमारे ८५ हजार निवासस्थाने, २३ हजार व्यावसायिक आस्थापने आणि १२ हजार झोपडपट्टी लोकवस्ती अशा एकूण  २.८ लाखांहून अधिक नागरिकांना मदत होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा >>> पुणे: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या स्वप्नांना बळ! ‘श्रम विद्या’ शैक्षणिक कर्ज योजना 

शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन आणि विलगीकरण, कचऱ्याचे ढीग नाहीसे करणे, कचऱ्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रक्रिया करणे, वस्तुंच्या पुनर्वापराविषयी जागृती करण्यासाठी ही मोहीम उपयुक्त ठरणार असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले. पीपीसीआरचे आशिष भंडारी म्हणाले, की शहरातील कॉर्पोरेट कंपन्या, अशासकीय संस्था, स्वयंसेवी गट आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकत्र येऊन स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनासाठी जनजागृती करण्याचा वेगळा उपक्रम आहे.  या मोहिमेच्या माध्यमातून शाश्वत कचरा व्यवस्थापन होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होऊ शकेल. तसेच स्वच्छ पुण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा उपक्रम इतर प्रभागांसाठी एक मानक प्रकल्प ठरेल असा विश्वास आहे.