पुणे : जुन्या पुणे-मुंबई रस्त्याचे रुंदीकरणावेळी प्रस्तावित बीआरटी मार्गाऐवजी पीएमपीसाठी स्वतंत्र मार्गिका करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. रुंदीकरणामुळे रस्ता ४२ मीटर होणार असून दोन्ही बाजूला अडीच मीटर रुंदीचे पादचारी मार्ग आणि दोन्ही बाजूने तीन मीटरची स्वतंत्र मार्गिका करण्यात येणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला जोडण्यासाठी जुना मुंबई-पुणे महामार्ग हा महत्त्वाचा रस्ता आहे. पुण्याच्या हद्दीत लष्कराकडून खडकीतील २.१ किलोमीटर लांबीच्या रस्ता आहे. तेथे लष्कराकडून जागा ताब्यात मिळत नसल्याने आठ वर्षापासून अंडी उबवणी केंद्रापासून ते संत तुकाराम महाराज पुलापर्यंत (हॅरिस ब्रीज) रस्त्याचे रुंदीकरणाचे काम रखडले होते.

Traffic police take action against vehicles engaged in illegal traffic in Vasai Virar city
बेकायदेशीर वाहनांवरील कारवाई जोरात, वाहनचालकांची पळापळ, नागरिकांना दिलासा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Traffic jam due to concreting on Aarey Road Mumbai news
आरे मार्गावर काँक्रीटीकरणानंतरही पुन्हा खोदकाम; अनेक ठिकाणी खड्डे खणल्यामुळे वाहतूक कोंडी
MSRTC on hike in bus fares review in marathi
विश्लेषण : एस.टी. भाडेवाढ अपरिहार्य होती का?
Review, Blue Red Flood Lines, Mula-Mutha River,
पुणे : नदीपात्राची निळी रेषा, लाल रेषा बदलणार?
Navi Mumbai year 2024 road accidents navi mumbai police
नवी मुंबई : रस्ते अपघातांमध्ये वर्षभरात २८७ मृत
bmc plans to concrete all roads but residents oppose concreting in their area
आम्हाला काँक्रिटिकरण नको, वांद्रे आणि मरीन ड्राईव्हच्या राहिवाशांची मागणी
Traffic jam on the old Pune to Mumbai highway Pune news
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी

जागा ताब्यात आल्यानंतर रखडलेले जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचे रुंदीकरणाची प्रक्रिया महापालिका प्रसासनाकडून सुरू करण्यात आली आहे. रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतर रस्त्याच्या मध्यभागी बीआरटी मार्ग करण्याचे पथ विभागाकडून जाहीर करण्यात आले होते. रस्ता रुंदीकरणाचे आत्तापर्यंत ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण केले जाणार आहे.

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर सीओईपी ते निगडी बीआरटी प्रस्तावित आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील बीआरटी मार्गाचे काम पूर्ण झाले असून, तेथे या सेवेचा वापरही सुरू आहे. मात्र, पुणे महापालिकेच्या हद्दीत जागा ताब्यात नसल्याने बीआरटी सेवा सुरू होऊ शकली नव्हती. रस्ता रुंदीकरणानंतर बीआरटी सेवा सुरू केली जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. पण आता हा निर्णय रद्द करून रस्त्याच्या दोन्ही बाजूने बससाठी स्वतंत्र मार्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा : पुण्यातील ‘या’ भागात सोमवारपासून एकवेळ पाणीपुरवठा; महापालिकेचा निर्णय

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी बीआरटी मार्गाची रचना न करता रस्त्याच्या दोन्ही बाजूने कडेला स्वतंत्र मार्गिका असणार आहे. मुख्य रस्ता आणि पीएमपीचा रस्ता वेगळा ठेवण्यासाठी छोटा दुभाजकही उभारण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.

Story img Loader