पाण्याची गळती थांबवण्यासाठी प्रभावी उपाय * गळती थांबवण्याच्या दिशेने एक पाऊल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहराला नव्या वर्षांची चाहूल केव्हाच लागली आहे. नवीन वर्षांच्या दिनदर्शिकाही घरोघरी पोहोचल्या आहेत. सरत्या वर्षांचा आढावा घेताना नवीन वर्षांत काय काय घडणार याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. म्हणूनच नव्या वर्षांत आपल्या शहरात आपल्यासाठी काय काय घडणार आहे, अशा काही बाबींवर हा दृष्टिक्षेप..

शहराची भविष्याची पिण्याच्या पाण्याची मागणी लक्षात घेऊन जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्यावर पाणीपुरवठा विभागाने भर दिल्यामुळे नव्या वर्षांत पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढणार आहे. तसेच पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते लष्कर जलकेंद्राच्या दरम्यानचे जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात असल्यामुळे वहनातील पाण्याची गळती थांबण्यासही मदत होणार आहे.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जे पाणी कालव्यातून घेण्यात येते, त्यात मोठय़ा प्रमाणावर गळती होऊन हे पाणी वाया जात होते. ते आता जलवाहिनीच्या माध्यमातून घेण्यात येईल. त्यामुळे सुमारे एक टीएमसी पाण्याची बचत व्हावी असे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत होते. त्यासाठी पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते लष्कर जलकेंद्र दरम्यान २२०० मिलीमीटर व्यासाच्या दाबनलिकेचा काम केले जाणार असून साडेसहा किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. हे काम सध्या ७० टक्क्य़ांहून अधिक पूर्ण झाले आहे. नव्या वर्षांत बंद जलवाहिनीच्या माध्यमातूनच पाणीपुरवठा होणार आहे.

सद्य:स्थितीत शहराच्या बहुतांश भागाला पर्वती आणि लष्कर जलकेंद्रांच्या माध्यमातूनच पाणीपुरवठा करण्यात येतो. महापालिकेने यापूर्वीच खडकवासला ते पर्वती जलकेंद्राच्या दरम्यान बंद जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण केले आहे. मात्र पर्वती ते लष्कर या दरम्यान बंद जलवाहिनी नव्हती. ते काम लवकरच पूर्ण होईल. या कामासाठी ११० कोटी रुपयांची भरीव तरतूदही करण्यात आली होती. त्यामुळे वहनातील पाण्याची गळती रोखली जाणार असून शहराच्या मध्यवर्ती भागाला सुरळीत पाणीपुरवठा करता येणे शक्य होणार आहे. तसेच कालव्यातून पाणी उचलण्याच्या प्रकारालाही आळा बसणार आहे. महापालिका कालव्यातून पाणी उचलत असल्यामुळे जादा पाणी उचलण्यात येत असल्याची तक्रार जलसंपदा आणि पाटबंधारे विभागाकडून सातत्याने करण्यात येते. मात्र आता बंद जलवाहिनीमुळे पाणीपुरवठय़ाचे अचूक नियोजन होणार आहे. सध्या कालव्यातून १५० एमएलडी एवढे पाणी उचलण्यात येते. तर उर्वरित पाणी हे पर्वती जलकेंद्रातून वितरित करण्यात येते. कालव्यातून पाणी उचलण्यात येत असल्यामुळे सुमारे पाणी गळतीचे प्रमाण हे पंधरा ते वीस टक्क्य़ांपर्यंत राहत होते. बंद जलवाहिनीतून नव्या वर्षांत पाणीपुरवठा होणार असल्यामुळे कालव्याचे पाणीही सिंचनासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

बंद जलवाहिनीप्रमाणेच तब्बल १७१ कोटी रुपयांचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पही नव्या वर्षांत कार्यान्वित होणार आहे. महापालिकेने स्वखर्चाने हा प्रकल्प पूर्ण केला आहे. पर्वती जलशुद्धीकरण प्रकल्पाशेजारी महापालिकेची १२ एकर जागा आहे. या जागेत हा प्रकल्प उभारण्यात येत असून या नव्या प्रकल्पात दररोज पाचशे दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया होणार आहे. लष्कर भागासाठी या प्रकल्पातून प्रामुख्याने पाणीपुरवठा होणार आहे. लष्कर येथे केंद्र असले, तरी ते १२५ वर्षे जुने आहे. त्यामुळे केंद्रातून पाणी गळती होण्याचे प्रमाण अधिक असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लष्कर जलकेंद्राची कामेही महापालिकेला हाती घेता येणार असून पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या क्षमतेमध्येही वाढ होणार आहे. त्यामुळे भविष्यातील शहराची पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन पाणीपुरवठय़ाचे नियोजन करणे सुलभ होणार आहे.

काय घडणार?

* पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढणार

* पाणीपुरवठय़ाचे अचूक नियोजन होणार

* १७१ कोटींचा नवा जलशुद्धीकरण प्रकल्पही कार्यान्वित होणार