वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी शहरात विविध ठिकाणी उड्डाणपुलांची उभारणी महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे; पण उड्डाणपुलांखालील जागेचे नेमके काय करायचे, याचे महापालिकेने कोणतेही स्पष्ट धोरण निश्चित केलेले नाही. त्यामुळे पुलांखालील जागांचा कोणीही, कशाही प्रकारे वापर करत आहे. कुठे वाहतूक शाखेची पोलीस चौकी, कुठे खासगी वाहनांचे पार्किंग, कुठे उद्यान तर कुठे जप्त केलेल्या दुचाकी ठेवण्यासाठीची जागा अशा कारणांसाठी या जागांचा वापर होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी विविध ठिकाणी उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली. या उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आल्यानंतर वाहतुकीची समस्या काही प्रमाणात सुटली. पण पुलांखाली असलेल्या मोकळ्या जागेत मात्र गैरप्रकार वाढले आहेत. या मोकळ्या जागांतील काही भागांचा उद्यानासाठीही वापर करण्यात आला आहे. अनेक जागांवर अतिक्रमण झाले असून ते वाढण्याचीही शक्यता असल्यामुळे त्यासाठी निश्चित धोरण ठरवणे आणि त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात त्याबाबतचे कोणतेही स्पष्ट धोरण महापालिका प्रशासनाकडून आखण्यात आलेले नाही. उड्डाणपुलाची उभारणी केल्यानंतर महापालिकेची जबाबदारी संपली असाच प्रकार झाल्याचे दिसून येत आहे.

नव्याने उभारलेल्या उड्डाणपुलांखालील मोकळ्या जागेत काही नगरसेवकांनी उद्याने उभरली आहेत. मोकळ्या जागेचा चांगला वापर व्हावा, या दृष्टिकोनातून उद्यानांची निर्मिती योग्य असली, तरी त्यावरूनही सातत्याने वाद झाले आहेत. त्यामुळे कुठे उद्यान तर कुठे नुसतेच बाक बसवण्यात आले आहेत. नगरसेवकांच्या मनात आले की उद्यान करायचे असे चित्र सध्या दिसून येत आहे. काही ठिकाणच्या जागांचा तर वाहतूक शाखेकडून वापर होत आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या छोटय़ा चौक्या उड्डाणपुलांखाली असून जप्त केलेल्या दुचाकी, चारचाकी गाडय़ा या मोकळ्या जागेत ठेवण्यात येत आहेत. याशिवाय या जागांचा वापर कुठे गोडाऊन म्हणून तर कुठे रिक्षा स्टॅण्डसाठी केला जात आहे.

शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू झाली आहे. या अंतर्गत विविध बाबींच्या पूर्ततेसाठी आणि शहर स्मार्ट करण्यासाठी धोरणे आखण्यावरच प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. महापालिकेने यापूर्वीही अनेक प्रकारची धोरणे केली आहेत. पण उड्डाणपुलांखाली तयार होणाऱ्या मोकळ्या जागांच्या वापराबाबतचे निश्चित धोरण नसल्यामुळे अतिक्रमणे सर्रास होत आहेत.