पुणे : महापालिकेचे आरोग्य प्रमुख म्हणून प्रतिनियुक्तीवर आलेले डॉ. आशिष भारती यांची बदली करण्यात आली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचे आदेश काढले असून त्यांना राज्याच्या आरोग्य विभागात उपसंचालक पदी नियुक्त करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आशिष भारती यांची बदली झाल्याने महापालिकेचे आरोग्य प्रमुख पद पुन्हा रिक्त झाले असून, या पदाचा कार्यभार प्रतिनियुक्तीवर राज्य शासनाकडून आलेल्या अधिकाऱ्याच्या हाती जाणार की महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांला प्रभारी म्हणून जबाबदारी मिळणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा >>> पिंपरी- चिंचवडच्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारीत वाढ ; एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा आज बंद

जिल्हा आरोग्य अधिकारी या संवर्गातील डॉ. आशिष भारती यांची ३० सप्टेंबर २०२० मध्ये महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी या पदावर एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ८ फेब्रुवारी २०२२ मध्ये डॉ. आशिष भारती यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदतवाढ ४ ऑक्टोबर २०२२ पर्यंत होती. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव चंद्रकांत वडे यांनी त्यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्यासंदर्भातील आदेश काढले आहेत. त्यांची महापालिकेतील बदली करण्यात आली असून आरोग्य विभागात उपसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाला गेल्या काही वर्षांपासून पूर्णवेळ आरोग्य प्रमुख मिळालेला नाही. डॉ. भारती यांच्यापूर्वी डाॅ. रामचंद्र हंकारे यांच्याकडे प्रतिनियुक्तीने ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. डॉ. भारती यांची बदली करण्यात आल्याने तूर्त हे पद पुन्हा रिक्त झाले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त या पदाची प्रभारी जबाबदारी आरोग्य विभागातील सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्याकडे सोपविणार की, राज्य शासन यासंदर्भात पुन्हा प्रतिनियुक्तीवर अधिकाऱ्याची नियुक्ती करणार, याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागात चर्चा सुरू झाली आहे.