पुणे : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठे यश मिळाले आहे. आज पर्यंतच्या इतिहासात कोणत्याही एका पक्षाला मिळाल्या नव्हत्या इतक्या जागा महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविणाऱ्या भाजपला मिळाल्या आहेत. पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसेच जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघातील १८ जागा महायुतीच्या उमेदवारांनी जिंकल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विधानसभेच्या निवडणुकीत अभूतपूर्ण यश महायुतीला मिळाले असून पुणे शहरातील आठ पैकी सात जागांवर भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे याचा आनंद व्यक्त करण्यासाठी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात शहरभर जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. नवनिर्वाचित आमदारांना विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे शहरात कोणत्याही प्रकारचे बेकायदा फलक लावू नये, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे अनधिकृत फलक लावल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दिलेला आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करत शहरातील चौकांमध्ये नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन करणारे फलक आणि लावून शहर विद्रुप करण्यात आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या फलकांवर कारवाई करण्यास पालिकेचा आकाशचिन्ह तसेच अतिक्रमण विभाग दुर्लक्ष करत आहे. हे फलक उभारण्यासाठी लावण्यात आलेले सांगाडे धोकादायक झाल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा >>> आमदारकीसाठी महायुतीत पुन्हा चढाओढ, नक्की काय आहे प्रकार ?
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शहरातील चौकांमध्ये तसेच रस्त्यांवर बेकायदा जाहिरात फलक, भित्तीपत्रके लावण्यात येणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले होते. त्यानंतर पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या उपायुक्तांनी न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत कोणीही बेकायदा फलक लावू नयेत, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा परिपत्रक काढून दिला होता. मात्र, राजकीय कार्यकर्त्यांनी पालिकेच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत संपूर्ण शहरात नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन करणारे बेकायदा जाहिरात फलक लावले आहेत.
न्यायालयाने केलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करत शहराच्या मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्ये अनधिकृत फलक लावण्यात आले आहेत. हे फलक नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन करणारे आहेत. या फलकांमुळे अनेक चौकांंतील वाहतूक नियंत्रक दिवे देखील झाकले गेले आहेत. महापालिकेच्या आकाशचिन्ह तसेच अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा >>> निवडणूक कामाच्या मानधनात तफावत?
बहुतांश फलक लाकडी सांगाड्यावर उभारण्यात आले. त्यामुळे येथे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राजकीय दबावापोटी महापालिकेकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे शहर विद्रुप होत आहे. या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.
गुन्हे दखल करण्याची हिंमत दाखवावी बेकायदा फलकांंबाबत न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले असतानाही शहरात चौकाचौकांत अनधिकृत फलक लावण्यात आले आहेत. महापालिका प्रशासन आणि पोलीस याबाबत केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत, असा आरोप सजग नागरिक मंच विवेक वेलणकर यांनी केला. महापालिकेने या फलकांवर ज्यांची नावे आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे. तसेच उच्च न्यायालयात महापालिका प्रशासनाने दाखल केलेल्या गुन्ह्यांची आणि ज्यांचे हे फलक आहेत. त्यांची माहिती दिली पाहिजे. मात्र पालिका अधिकाऱ्यांचे राजकीय मंडळींशी हितसंबंध असल्याने यावर कोणतीही कारवाई होत नाही, असा आरोपही वेलणकर यांनी केला.