फर्ग्युसन रस्ता तसेच जंगलीमहाराज रस्ता यासह काही रस्त्यांवरील पे अ‍ॅन्ड पार्क या योजनेच्या ठेक्याची मुदत संपलेली असल्यामुळे या रस्त्यांवर चार चाकी वाहने लावण्यासाठी वाहनचालकांनी शुल्क देऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
शहरातील फर्ग्युसन रस्ता, जंगलीमहाराज रस्ता, सोहराब हॉल ते ताडीवाला रस्ता, ढोले पाटील रस्ता ते रुबी हॉल चौक ते कोलते पाटील बिल्डिंग, नॉर्थ मेन रस्ता येथील दोन पेट्रोल पंप ते गोल्ड अ‍ॅडलॅब्ज पूल ते ब्ल्यू डायमंड रस्ता ते साधू वासवानी पूल ते येरवडा पूल, कल्याणीनगर गोल्ड अ‍ॅडलॅब्ज ते सायबेज, अलंकार चित्रपटगृह ते विश्रामगृह, ब्ल्यू नाईल चौक ते वाहतूक पोलीस कार्यालय ते स्टेट बँक, पूरम चौक अभिनव महाविद्यालय ते शनिपार ते दक्षिणमुखी मंदिर या रस्त्यांवरील पे अ‍ॅन्ड पार्क योजनेची मुदत संपली आहे. त्यामुळे या रस्त्यांवरील पे अ‍ॅन्ड पार्क योजना बंद झाली असून या रस्त्यांवर चार चाकी वाहने लावण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क वाहनचालकांनी देऊ नये, असे पालिकेने कळवले आहे.

Story img Loader