पुणे शहराची वाढ झपाटय़ाने होत असतानाच प्रदूषणाचा प्रश्नही मोठा होत आहे. त्यामुळे पुणे शहर हिरवे ठेवण्यासाठी बांधकामाचे नियम सक्षम करून त्याची काटेकोरपणे अंमलबजाणी झाली पाहिजे, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
पुणे महापालिकेच्या मुख्य भवनाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर दत्तात्रय धनकवडे, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा व जलसंधारणमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, उपमहापौर आबा बागुल, आमदार अनिल भोसले, अ‍ॅड. जयदेव गायकवाड, सभागृह नेते सुभाष जगताप, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, पालिका आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया आदी या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, पुण्यात लोकसंख्या वाढीचे प्रमाण मोठे आहे. शहराचा विस्तार झपाटय़ाने होतो आहे. त्याबरोबरच समस्याही वाढत आहेत. पाण्याची मागणी वाढली आहे. शहराला पाणी वाढवले, तर जिल्ह्य़ामध्ये वेगळ्या चर्चा सुरू होतात. पण, नागरी भागाच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे लागते. शहर वाढत असताना प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छ हवेसाठी पर्यावरणाचा विचार होणे गरजेचे आहे. शहर हिरवे ठेवण्यासाठी बांधकामाचे नियम सक्षम करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वानीच पुढे येण्याची गरज आहे.
बापट म्हणाले, शहराचा विस्तार लक्षात घेता १५ क्षेत्रीय कार्यालयांना जास्तीत जास्त अधिकार देण्याची आवश्यकता आहे. पालिकेचे अंदाजपत्रक सुविधांवर जास्त खर्च झाले पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा