पिंपरी : महापालिकेच्या वतीने सांगवी-बोपोडी असा मुळा नदीवर पूल बांधण्यात येत आहे. पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यासाठी ३२ कोटी ३६ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. आता पुलाच्या सुशोभीकरणावर आणखी २० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार हे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचा दावा महापालिका अधिकाऱ्यांनी केला आहे.
या पुलासाठी ३२ कोटी ३६ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. हे काम टी अँड टी इन्फ्रा लिमिटेड कंपनी करत आहे. कामाची मुदत दोन वर्षे होती. मात्र, पुण्याकडील राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्राची जागा मिळण्यास विलंब झाल्याने ठेकेदाराला ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. सप्टेंबर महिन्याचे पंधरा दिवस झाले तरी अद्याप पुलाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे रहदारी सुरू करण्यात आली नाही. असे असताना पुलाच्या सुशोभीकरणासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. केवळ सुशोभीकरणावर १९ कोटी ६३ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
हेही वाचा >>> PM Modi : “पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणं मोठी चूक”, घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी सांगितले नियम
पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराला जोडणारा हा पूल आहे. त्यामुळे पुलाचे उत्तमरीत्या सुशोभीकरण करण्यासाठी माजी महापौर आणि माजी नगरसेवकांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला आहे. त्यानुसार पुलाचे संकल्पचित्र व प्राथमिक आराखडा बनविण्यात आला. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर २५ ऑगस्टला सादरीकरण करण्यात आले. त्यांनी सुचविलेले बदल समाविष्ट करून आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार पुलाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
पुलाकडे जाणारे रस्ते अरुंद
या नवीन पुलाकडे जाणारे सांगवीतील सर्व रस्ते अरुंद आहेत. पुलाकडे जाण्यासाठी सांगवीतील ममतानगर, दत्त आश्रम मठ, प्रियदर्शनीनगर, पवनानगर, मुळानगर हे रस्ते आहेत. ते सर्व अरुंद आहेत. पुणे शहराकडून ये-जा करणारी वाहतूक रहदारी मोठी असणार आहे. त्यामुळे अंतर्गत अरुंद रस्त्यांवर वाहतूककोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.