पुणे : राहू-वाघोली रस्त्यावर सांगवी फाटा परिसरात सोमवारी पीएमपी बसच्या स्टेअरिंगचा लोखंडी दांडा तुटल्याने बस रस्त्याकडेला चारीत शिरली. अपघातात पीएमपी बसमधील दहा प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “पुढील ४८ तासांत पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील मशिदीच्या अतिक्रमणावर कारवाई करा”, आमदार महेश लांडगे यांची मागणी

हेही वाचा – पुणे : चौकीच्या आवारातच पोलीस निरीक्षक महिलेवर पोलीस कर्मचाऱ्याने केला हल्ला

पुणे स्टेशन ते पारगाव या मार्गावरील पीएमपी बसमधून दौंड तालुक्यातील विद्यार्थी, नोकरदार दररोज पुण्यात ये-जा करतात. राहू-वाघोली रस्त्यावर सांगवी फाटा परिसरात सोमवारी सकाळी पीएमपी बसचा स्टेअरिंगचा लाेखंडी दांडा तुटला. त्यामुळे पीएमपी बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत शिरली. बसमधील दहा प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये महाविद्यलयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे, अशी माहिती यवत पोलिसांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmp bus accident due to broken steering rod ten passengers including students were injured pune print news rbk 25 ssb
Show comments