थकीत रक्कम मिळावी, या मागणीसाठी पीएमपीने भाडेकरार केलेल्या खासगी ठेकेदारांनी पुकरलेला संप सोमवारी कायम राहिला. पीएमपी प्रशासन आणि ठेकेदार यांच्यातील प्राथमिक चर्चा निष्फळ ठरली. सोमवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात केवळ ९५४ गाड्या संचलनात असल्याने या दोन्ही शहरातील प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला. होळीच्या सणासाठी बाहेरगावी जाणा-या प्रवाशांना अन्य वाहतूक पर्यायांचा वापर करावा लागला.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे शिष्टमंडळ पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थपकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना भेटणार आहेत. ठेकेदारांबरोबर चर्चा सुरू असून सायंकाळपर्यंत संप मिटेल, असा दावा पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> पुणे : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या अडीच वर्षांच्या बालिकेचा खून; आईसह प्रियकर अटकेत
पीएमपीच्या ठेकेदरांनी रविवारी दुपार पाळीपासून अचानक संप पुकारला आहे. यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील बहुतांश गाड्या मार्गावर धावू नसून पीएमपीने स्वमालकीच्या गाड्यांद्वारे सेवा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यात पीएमपीच्य स्वम्लकीच्या ८२९ गाड्या असून भाडेकरारावरील १२५ गाड्यांचा समावेश आहे. निम्म्याहून अधिक गाड्या मार्गावर न आल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील लाखो प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. मुळातच प्रवासी संख्या पहाता पीएमपीच्या ताफ्यात अपुऱ्या गाड्या आहेत. संचलन तूट आणि अन्य रक्कम पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी थकीत रक्कम द्यावी, यासाठी हा संप पुकारण्यात आला असून पीएमपी प्रशासनाकडून ठेकेदारंबरोबर प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. संप न मिटल्यास इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>पुणे : खबऱ्याला पोलीस हवालदाराकडून शिवीगाळ; निलंबनाचे आदेश
मे. ट्रॅव्हल टाईम मोबिलिटी इंडिया प्रा.लि., मे. ॲन्टोनी गॅरेजेस प्रा.लि., मे.हन्सा वहन इंडीया लि., मे. ओलेक्ट्रा ग्रीनटेक लि., मे. ईव्ही ट्रान्स प्रा. लि. आणि मे. ओहा कम्युट प्रा. लि. यांनी संपात सहभाग घेतलेला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून निधी उपलब्ध होणेबाबत मागणी करण्यात आली आहे. पीएमपी प्रशासनाने पंधरा मार्च २०२३ पर्यंत संबंधित ठेकेदारांची देयके देण्यात येणार असून तसे पत्र पीएमपीकडून ठेकेदारांना देण्यात आले आहे. मात्र संप कायम राहिल्याने सोमवारी प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. त्याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.