वाहतूक कोंडीत मोटारीला जाण्यास जागा न दिल्याने मोटारचालक आणि साथीदारांनी पीएमपी चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना शंकरशेठ रस्त्यावर घडली. या प्रकरणी मोटारचालकासह चौघांच्या विरोधात खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पुणे : बनावट पावती पुस्तके तयार करुन सोसायटीच्या नावाने वर्गणी ; तरुणाच्या विरोधात गुन्हा

या प्रकरणी मोटार चालक निखील राजेश कटके (वय २६), कविता राजेश कटके (वय ४४), नितीन जयपाल कटके (वय ४७, तिघे रा. श्रीकृष्ण सोसायटी, गुलटेकडी) तसेच एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीएमपी चालक लक्ष्मण सुभाष धुमाळ (वय ४१, रा. अंजनीनगर, कात्रज) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आळंदी ते स्वारगेट या मार्गावरील पीएमपी बस स्वारगेटकडे जात होती. शंकरशेठ रस्त्यावरील मीरा सोसायटीजवळ वाहतूक विस्कळीत झाली होती. त्या वेळी मोटारीला पुढे जाण्यास जागा न दिल्याने मोटार चालक निखील कटकेने पीएमपी चालक धुमाळ आणि वाहक अतुल कुलकर्णी यांना शिवीगाळ केली.

हेही वाचा >>> पुणे : ३० टक्के भाजपचे काँग्रेसीकरण ; जयंत पाटील यांची टीका

निखिल आणि साथीदार पीएमपी बसमध्ये शिरले. त्यांनी पीएमपी चालक धुमाळ आणि वाहक कुलकर्णी यांना शिवीगाळ केली. कठीण वस्तुने धुमाळ यांना मारहाण केली. त्या वेळी वाहक कुलकर्णी आणि बसमधून प्रवास करणारे वाबळे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. सरकारी कामात अडथळा तसेच मारहाण केल्या प्रकरणी मोटारचालकासह साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक तपास करत आहेत.