बोनससाठी निधी देण्यास महापालिकेची मान्यता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीएमपीच्या दहा हजार कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान आणि महापालिकेच्या सेवकांप्रमाणे १३ हजार रुपये बक्षिशी देण्यासाठी ३२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी देण्यास पुणे महापालिकेने मान्यता दिली आहे. त्यामुळे पीएमपीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली असून पीएमटी कामगार संघाने (इंटक) या निर्णयाचे स्वागत केले आहे.

पीएमपीच्या तरतुदीनुसार कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान आणि महानगरपालिकेच्या सेवकांप्रमाणे बक्षिशी देण्याची तरतूद आहे. त्यानुसार सानुग्रह अनुदान आणि बक्षिशीची रक्कम मिळावी यासाठी इंटककडून महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.

कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान आणि बक्षिशी देता यावी यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांनी पीएमपी पासपोटीची ३२ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम पीएमपी प्रशासनाला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या निधीतून सानुग्रह अनुदान देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानासाठी पाठपुरावा करताना इंटकला आंदोलन करावे लागले नाही. दोन्ही महानगरपालिकांनी ही रक्कम तत्काळ उपलब्ध करून दिल्याबद्दल इंटकचे अध्यक्ष राजेंद्र खराडे आणि महासचिव नरूद्दीन इनामदार यांनी महापालिकांचे अभिनंदन केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmp employees get diwali sweet
Show comments