पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) आणि बक्षिसाची रक्कम देण्यात येणार आहे. पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याने पीएमपीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला होता. त्यानंतर पीएमपी कर्मचाऱ्यांनाही बोनस जाहीर करावा, अशी मागणी विविध इंटकसह अन्य संघटनांनी केली होती. त्यानुसार संचालक मंडळाच्या बैठकीत बोनस देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि त्याला मान्यता देण्यात आली.

Barsu oil refinery project
बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन महायुतीत जुंपली
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
building unauthorized Check Dombivli, Kalyan Dombivli Municipal corporation,
पालिकेच्या संकेतस्थळावर इमारत अधिकृत की अनधिकृत याची खात्री करा, कल्याण डोंबिवली पालिकेचे आवाहन
Sanjay Malhotra loksatta article
अन्वयार्थ : कपातपर्वाचा पायरव?
t Plus zero transaction system
आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये ३१ डिसेंबरपासून ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणाली
leakage from main water pipeline schedule for water supply disrupts in bandra
मुख्य जलवाहिनीतून गळती; वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी विशेष वेळापत्रक
Pune and Pimpri Chinchwad may raise PMPML ticket prices due to rising operational deficit
पीएमपी तिकीट दरवाढीचे भवितव्य, ‘दादांच्या ‘ हाती, काय निर्णय घेणार ?

हेही वाचा… ‘पीडीसीसी’ बँकेच्या माध्यमातून पार्थ पवारांचा सक्रिय राजकारणात प्रवेश?

मूळ वेतन तसेच महागाई भत्ता यावर ८.३३ टक्के याप्रमाणे सानुग्रह अनुदान आणि २१ हजार रुपये बक्षीस रक्कम देण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. सानुग्रह अनुदान आणि बक्षिसाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिवाळीपूर्वी जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे पीएमपीच्या कर्मचारी वर्गातही समाधानाचे वातावरण आहे.

पीएमपीची दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या आणि उत्पन्नात अलीकडे वाढ झाली आहे. प्रवासीभिमुख सेवा देण्यासाठी पीएमपीकडून प्रवासी मित्र, आगारनिहाय पालक अधिकारी असे उपक्रम राबविण्यात येत आहेत. पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही सानुग्रह अनुदान आणि बक्षीस रक्कम देण्यात येईल, असे पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

Story img Loader