कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी पीएमपीकडून विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. पीएमपीच्या वतीने शनिवार आणि रविवार (३१ डिसेंबर आणि १ जानेवारी) जादा गाड्या सोडण्यात येणार असून, ही बससेवा भाविकांसाठी विनामूल्य असणार आहे.

हेही वाचा >>>पुणे: बाणेरमध्ये नियोजित गृहप्रकल्पात टाकीची भिंत कोसळून मजूर मृत्युमुखी; ठेकेदारासह दोघांविरुद्ध गुन्हा

कोरेगाव-भीमा येथील विजसस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यातून तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित रहात असतात. ही बाब लक्षात घेऊन येत्या शनिवारी सायंकाळी नऊ वाजल्यापासून रविवारी सकाही सहा वाजेपर्यंत तुळापूर फाटा, लोणीकंद कुस्ती मैदान येथून ४० गाड्या, वडू फाटा ते वढू या मार्गावर पाच तसेच तोरणा हाॅटेल शिक्रापूर रस्ता ते कोरेगांव-भीमा र्पंत ३५ अशा एकूण ८० गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच रविवारी सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत तुळापूर फाटा, लोणीकंद कुस्ती मैदान, खंडोबा माळ, फूलगांव शाळा ते पेरणे टोल नाका पर्यंत १४० गाड्या आणि शिक्रापूर रस्ता ते कोरेगांव-भीमापर्यंत १५ गाड्या, वढू फाटा ते वढूपर्यंत २५ गाड्या अशा एकूण २८० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>पुणे: सिंहगड रस्ता भागात घरफोडी करणारा चोरटा गजाआड; अडीच लाखांचा ऐवज जप्त

दरम्यान, मोलेदिना बस स्थानक, मनपा भवन, दापोडी, ढोले पाटील रस्ता, अप्पर डेपो, पिंपरी येथील आंबेडकर चौक, भोसरी स्थानक, हडपसर स्थानक येथील ३५ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. या मार्गावरील सेवेसाठी तिकीट आकारले जाणार आहे. या सर्व स्थानकातून मिळून एकूण ५५ गाड्या दररोज सोडल्या जातात. ३५ जादा गाड्यांमुळे गाड्यांची संख्या ९० होणार आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

Story img Loader