पुणे : पीएमपीला गाड्या पुरवणाऱ्या ठेकेदारांना थकीत देयकापोटीची ६६ कोटींची रक्कम पीएमपी प्रशासनाने उपलब्ध करून दिल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा ठेकेदारांनी संप मागे घेतला. त्यामुळे मंगळवारपासून पीएमपीची पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सेवा पूर्ववत होण्यास सुरूवात झाली. संप मिटल्याने पीएमपीच्या प्रवासी आणि विदयार्थ्यांना दिलास मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अन्नातून विषारी ओैषध; श्वानाच्या तीन पिलांचा मृत्यू; वारजे भागतील घटना

पीएमपीला काही ठेकेदार गाड्यांचा पुरवठा करतात. यापैकी काही ठेकेदारांनी ९० कोटींची थकीत रक्कम मिळावी, यासाठी रविवारपासून कोणतीही पूर्वकल्पना न देता संप सुरू केला होता. त्याचा पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील आठ लाख प्रवाशांना फटक बसला होता. संप सुरू झाल्यानंतर पीएमपीच्या वरिष्ठ अधिका-यांनी ठेकेदारांबरोबर चर्चा सुरू केली होती. मात्र थकीत रक्कम मिळत नाहीत, तोपर्यंत गाड्या संचलनात येणार नाहीत, अशी भूमिका ठेकेदारांनी घेतली होती. संप कायम राहिल्यास इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता होती. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळानेही पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांची भेट घेतली होती.

थकीत रकमेपोटी ६६ कोटी रूपये तातडीने देण्यात आले. त्यासाठी पुणे महापालिकने  ५४ कोटी तर पिंपरी-चिंचवड महापालिकेने ३६ कोटी पीएमपीला दिले. त्यातून ६६ कोटी ठेकेदारांना आणि उर्वरीत रक्कम एमएनजीएलला थकीत रकमेपोटी देण्यात आली. त्यानंतर संप मागे घेण्यात आला.

हेही वाचा >>> Maharashtra Unseasonal Rain : मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी; शेतपिकांचंही मोठं नुकसान

संपामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात केवळ ९२३ गाड्या संचलनात असल्याने या दोन्ही शहरातील प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला होत.  प्रवाशांना अन्य वाहतूक पर्यायांचा वापर करावा लागला. प्रवासी संख्या पहाता पीएमपीच्या ताफ्यात अपु-या गाड्या आहेत. मे. ट्रॅव्हल टाईम मोबिलिटी इंडिया प्रा.लि., मे. अॅन्टोनी गॅरेजेस प्रा.लि., मे.हन्सा वहन इंडीया लि., मे. ओलेक्ट्रा ग्रीनटेक लि., मे. ईव्ही ट्रान्स प्रा. लि. आणि  मे. ओहा कम्युट प्रा. लि.या ठेकेदारांनी संप पुकारला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmpl contractors called off strike after administration made available rs 66 crores fund pune print news apk 13 zws
Show comments