थकीत रक्कम मिळावी या मागणीसाठी पीएमपीला भाडेतत्वावर गाड्या पुरविणाऱ्या ठेकेदारांनी अचानक संप सुरू केला आहे. त्यामुळे सातशे गाडया रस्त्यावर येऊ न शकल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीच्या प्रतिदिन १ हजार ५०० गाड्या धावतात. पीएमपीने गेल्या काही महिन्यांपासून थकबाकी दिलेली नाही. त्यामुळे थकबाकीची रक्कम तातडीने न दिल्यास सेवा बंद करण्यात येईल, असे पत्र ठेकेदारांकडून पीएमपी प्रशानसाला देण्यात आले होते. पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या गाड्यांपैकी निम्म्या गाड्या ठेकेदारांच्या आहेत. गेल्या सहा महिन्यांपासूनची रक्कम मिळाली नसल्याचा दावा ठेकेदारांकडून करण्यात आला आहे.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
traffic jam at Khandala Ghat , traffic jam Mumbai Pune Expressway,
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा
RTO officials fined over 40 Dombivli rickshaw drivers between 5,000 to 20,000 rupees.
डोंबिवलीत १२५ हून अधिक रिक्षा चालकांची ‘आरटीओ’कडून तपासणी, ४० हून अधिक रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई
mumbai Eastern Express Highway
पूर्व द्रुतगती महामार्ग ते बीकेसी प्रवास अतिवेगवान, १८० मीटरची मिसिंग लिंक पूर्ण; सोमवारपासून मार्ग सेवेत
Pune City School , Student Transport Pune ,
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालक आक्रमक, ‘आरटीओ’ कारवाई करणार ?
PMP , Sawai Gandharva Festival, Special Bus Service of PMP,
सवाई गंधर्व महोत्सवासाठी पीएमपीची विशेष बससेवा, कोणत्या मार्गांवरून कधी धावणार बस ?
PMP bus pune, PMP bus accident risk,
पुणेकर सावधान! रस्त्यांवरून धावताय मृत्यूचे सापळे, प्रवाशांचा जीव धोक्यात?

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून संचलन तूट पीएमपीला देण्यात येते. त्यातून विविध रक्कम अदा केली जाते. ठेकेदारांना थकीत ९९ कोटी ९३ लाख १४ हजार २४९ रुपये देणे आहे. यापैकी काही दिवसांपूर्वी ६६ कोटी ५० लाख रुपये देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही गाडया पुरवठादार ठेकेदारांनी गाड्या उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. दरम्यान ठेकेदारांवर कारवाई करण्याचा इशारा पीएमपी प्रशासनाने दिला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदेलनाचा इशारा दिला आहे.

आठ ठेकेदारांकडून ८४० गाड्या पुरविण्यात येतात. त्यापैकी सातशेहून अधिक गाड्या सध्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. ठेकेदारांना मेस्सा कायद्याअंतर्गत नोटीस बजाविण्यात आली आहे.

Story img Loader